Earn Money | फक्त 420 रुपये देऊन दरमहिना मिळवा 10 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ विशेष स्कीम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही सुद्धा एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana APY) पैसे लावू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती 18 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली करण्यात आली. ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेत वयाच्या 60 व्या वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरूवात (Earn Money) होते.

काय आहे अटल पेन्शन योजना?
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. यामध्ये वयाच्या हिशोबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो. सर्वात कमी प्रीमियम 18 वर्षाच्या वयात योजनेचा लाभ (Earn Money) घेतल्यास द्यावा लागतो. सर्वात जास्त प्रीमियम 30 वर्षाच्यानंतर द्यावा लागतो. कारण पेन्शनची किमान रक्कम 1000 मासिक आणि कमाल 5000 मासिक ठरवलेली आहे. प्रीमियम देताना पेन्शनच्या रक्कमेला आधार बनवले जाते.

मिळतात ‘हे’ फायदे
योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. यामध्ये वयाच्या हिशेबाने मंथली प्रीमियम ठरलेला असतो. या योजनेत सहभागी होणार्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळेल.

दरमहिना मिळतील 10,000 रुपये
या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या मासिक कमाईतील एक छोटा भाग Atal pension yojana मध्ये गुंतवावा लागेल.
जर योजनेचा लाभ घेणार्‍या व्यक्तीचे वय 18 वर्ष आहे तर त्यास 210 रुपये महिना गुंतवणूक करावी लागेल.
तर, 39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती-पत्नी वेगवेगळे या योजनेत 420 रूपये जमा करून 60 वर्षाच्या वयानंतर दरमहिना 10,000 रूपये पेन्शन घेऊ शकतात.

 

जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

या योजनेत दरमहिना 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी दर महिना केवळ 42 रुपये जमा करावे लागतील.
तर 2000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहिना 168 रुपये जमा करावे लागतील.

टॅक्स बेनिफिट
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एनपीएसप्रमाणे समान कर सवलत मिळते.
आयकर कायदा, कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत या योजनेत करात सवलत मिळते.

Web Title :- Earn Money | atal pension yojana get rupees 10000 monthly you can invest in just rs 420

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,029 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

Pune Corporation | ड्रेनेज सफाईसाठी 4 जेटींग मशीन 7 वर्षे भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक महिना पुढे ढकलला