Earn Money | IRCTC सोबत सुरू करा ‘हा’ बिझनेस, आरामात बसून कमवा हजारो रुपये महिना

नवी दिल्ली : Earn Money | तुम्ही बेरोजगार आहात का? किंवा नोकरी करत आहात आणि जास्त पैसे कमवायचे आहेत का? जर असे असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत, जिच्या मदतीने तुम्ही दर महिना रू. 80,000 पर्यंत कमावू शकता. (Earn Money)

 

सर्वात मोठी गोष्टी ही आहे की, तुम्हाला कुठेही जायचे नाही आणि हा बिझनेस रेल्वेसोबत मिळून करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) रेल्वेसाठी तिकिट बुकिंग, ट्रेनमध्ये जेवण उपलब्ध करणे अशा अनेक सुविधा पुरवते. तुम्ही IRCTC साठी ऑनलाइन तिकिट बुकिंग एजंट (online ticket booking agent) बनू शकता. एका आकड्यानुसार, रेल्वेची 55% पेक्षा जास्त तिकिटे ऑनलाइन बुक होतात. म्हणजे रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंगमध्ये भरपूर संधी आहे.

 

काय करावे लागेल तुम्हाला?

ज्या प्रकारे रेल्वे काऊंटर (Railway ticket counter) वर क्लर्क तिकिट देतात, त्याच प्रमाणे तुम्हाला सुद्धा प्रवाशांना तिकिट विक्री करावी लागेल. एक एजंट प्रति महिना 80,000 रुपयांपर्यंत रेग्युलर इन्कम मिळवू शकतो.

 

एजंट बनण्यासाठी करावे लागेल अप्लाय

सर्वप्रथम ऑनलाइन तिकिट विक्रीसाठी IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन एजंट बनण्यासाठी अप्लाय करावे लागेल. यानंतर तुम्ही एक ऑथराईज्ड तिकिट बुकिंग एजंट (Ticket booking agent) बनू शकता. नंतर तुम्ही तिकिट बुक करू शकता. तिकिट बुक केल्यानंतर IRCTC कडून एजंटला चांगले कमिशन मिळते.

 

कशी होईल कमाई?

कोणत्याही प्रवाशासाठी नॉन एसी कोचचे तिकिट बुक केल्यास 20 रुपये प्रति तिकिट आणि एसी क्लासचे तिकिट बुक केल्यास 40 रुपये प्रति तिकिट कमीशन मिळते. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्के सुद्धा एजंटला दिले जाते. (Earn Money)

 

IRCTC चे एजंट बनण्याचा आणखी एक मोठा फायदा हा आहे
की यामध्ये तिकिट बुक करण्याचे कोणतेही लिमिट नाही.
महिन्यात तुम्ही हवे तेवढे तिकिट बुक करू शकता.

 

याशिवाय 15 मिनिटात तात्काळ तिकिट बुक करण्याचा सुद्धा पर्याय मिळतो.
एक एजंट म्हणून तुम्ही ट्रेनशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकिट सुद्धा बुक (Flight Ticket Booking) करू शकता.

 

बुकिंग एजन्सीसाठी दोन प्लॅन आहेत, पहिल्या प्लॅनसाठी एकवर्षासाठी चार्ज आहे 3,999 रुपये.
दूसर्‍या प्लॅनमध्ये दोन वर्षासाठी एजन्सी चार्ज 6,999 रुपये आहे.
एक एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट 10 रुपयांची फी द्यावी लागते.

 

तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट 8 रुपये आणि
एक महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिट बुक केल्यास प्रति तिकिट पाच रुपयांची फी द्यावी लागते.

 

Web Title :- Earn Money | business idea become irctc agent business with low investment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा