Earn Money | केवळ 10,000 रुपयात सुरू करा असे साईड बिझनेस, दर महिना होईल मोठी कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | आजकाल लोक नोकरीसोबतच कमाई वाढवण्यासाठी विविध उपाय करतात. काही लोक आपली कमाई गुंतवणुकीद्वारे वाढवतात तर काहीजण साईड बिझनेसद्वारे (Side Business) कमाई वाढवतात. जर तुम्ही नोकरीसोबतच काही अतिरिक्त कमाई (Extra Income) करण्याचाही विचार करत असाल, तर आम्ही काही चांगल्या आयडिया देत आहोत, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत घरबसल्या सहज दरमहा लाखो रुपये कमवू (Earn Money) शकता. हे असे व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला नोकरीपेक्षा जास्त कमाई होईल. (Business Idea)

 

1. खडू बनवण्याचा व्यवसाय (Chalk Making Business)
खडू बनवणे हा एक असा व्यवसाय आहे ज्यासाठी खूप कमी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही घरबसल्या सहज सुरू करू शकता. सर्व शाळा, महाविद्यालयात खडू आवश्यक असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. खडू तयार करण्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. तुम्ही फक्त 10,000 रुपयांपासून तो सुरू करू शकता. यामध्ये पांढर्‍या खडूसह रंगीत खडूही बनवता येतात.

 

खडू प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster of Paris) पासून बनवले जातात. ही पांढर्‍या रंगाची पावडर आहे. ही एक प्रकारची माती आहे जी जिप्सम (Gypsum) नावाच्या दगडापासून तयार केली जाते.

 

2. टिकली बनवण्याचा व्यवसाय (Bindi making Business)
सध्या बाजारात टिकलीची मागणी खूप वाढली आहे. पूर्वी केवळ विवाहित महिलाच टिकली लावत असत, मात्र आता मुलींनी टिकली लावण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. इतकंच नाही तर परदेशातील महिलाही टिकली लावू लागल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. फक्त 12,000 रुपये गुंतवून घरात बसून टिकली बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो. (Earn Money)

3. लिफाफा बनवण्याचा व्यवसाय (Envelope Making Business)
लिफाफे बनवणे हा अतिशय सोपा आणि स्वस्त व्यवसाय आहे. हे कागद किंवा कार्ड बोर्ड इत्यादीपासून बनवता येणारे उत्पादन आहे.
हे मुख्यतः पॅकेजिंगसाठी वापरले जाते. ज्याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी गोष्टींच्या पॅकेजिंगसाठी केला जातो.
हे नेहमीच तेजीत असणारा व्यवसाय आहे. म्हणजेच या व्यवसायात दर महिन्याला कमाई असेल.

 

जर तुम्ही हा व्यवसाय घरातून सुरू केला तर तुम्हाला 10,000 ते 30,000 रुपये गुंतवावे लागतील
आणि जर तुम्ही मशीनने लिफाफे बनवले तर त्यासाठी तुम्हाला 2,00,000 ते 5,00,000 रुपये गुंतवावे लागतील.

 

4. मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय (Candle making Business)
काळानुरूप या व्यवसायात बरेच बदल झाले आहेत. पूर्वी दिवे गेल्यावर मेणबत्त्या वापरल्या जात होत्या.
आता वाढदिवस, घर, हॉटेल्स सजवण्यासाठी त्याचा वापर वाढला आहे.
अशा स्थितीत मेणबत्त्यांची मागणी खूप वाढली आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल
तर तुम्ही 10,000 ते 20,000 रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय करू शकता.

 

Web Title :- Earn Money | business idea start chalk making envelope making business with small investment earn per month lakh rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Karuna Sharma | करुणा शर्मांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘शक्ती कायदा केवळ दिखावा’

 

Aditya Thackeray | राज्यात उद्या राजकीय भूकंप? संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले-‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’

 

SIP in Mutual Funds | 45 वर्षाच्या वयात करोडपती बनून व्हाल निवृत्त ! केवळ 177 रुपये रोज करा बचत; जाणून घ्या कसे