Earn Money | घरबसल्या 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, दर महिना होईल 60,000 रुपयांची कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत. हा एक असा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल आणि भरपूर पैसे कमावू शकता (How To Earn Money). हे असे प्रॉडक्ट आहे ज्यास बाजारात नेहमीच मागणी असते. आज आम्ही तुम्हाला डिस्पोजेबल पेपर कप व्यवसाया (Disposable Paper Cup Business) बद्दल सांगणार आहोत. (Earn Money)

 

कागदी ग्लासलाही मागणी
आजकाल डिस्पोजेबल पेपर कपची मागणी खूप वाढली आहे. लोक कागदापासून बनवलेले कप जास्त वापरत आहेत. कागदी ग्लासही बनवले जात आहेत. या ग्लासांमध्ये ज्यूस दिला जात आहे.

 

सरकारकडून मिळते मदत
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) कडूनही मदत केली जात आहे. वास्तविक, देशातील वाढते प्रदूषण दूर करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. सरकार प्लास्टिक बंदी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पेपरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विशिष्ट प्रकारच्या कागदापासून ग्लास आणि कप बनविण्याच्या व्यवसायाला पेपर कप बनविण्याचा व्यवसाय म्हणतात. (Earn Money)

 

सरकार देते व्याजावर सबसिडी
या अंतर्गत वेगवेगळ्या आकाराचे ग्लास बनवले जातात. कागदापासून बनवल्यामुळे त्यांची सहज विल्हेवाट लावता येते. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज (Mudra Loan) योजनेतूनही मदत मिळते. मुद्रा कर्जाअंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देते.

25% रक्कम स्वत: गुंतवावी
या योजनेंतर्गत, तुम्हाला एकूण प्रकल्प खर्चाच्या 25% रक्कम स्वत:ला गुंतवावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत सरकार 75 टक्के कर्ज देते. हा व्यवसाय करण्यासाठी 500 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा आवश्यक आहे. मशिनरी, उपकरणे आणि फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री-ऑपरेटिव्हसाठी 10.70 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

 

असे आहेत मशीनचे प्रकार
यासाठी लहान आणि मोठी मशीन्स बसवावी लागतात. लहान मशीनने एकाच आकाराचे कप बनवू शकता.
तर मोठे मशीन सर्व आकाराचे ग्लास/कप बनवते.
1 ते 2 लाख रुपयांमध्ये फक्त एकाच आकाराचे कप/ग्लास बनवण्याचे मशीन उपलब्ध असेल.
ज्याच्या मदतीने तुम्ही उत्पादन सुरू करू शकता.

 

येथे मिळतात मशीन
दिल्ली, हैद्राबाद, आग्रा आणि अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये ही मशीन्स मिळतात. रॉ मटेरियल म्हणून कप बनविण्यासाठी पेपर रिळ लागतील जे सुमारे 90 रुपये प्रति किलो दराने मिळतील.
यासोबतच, बॉटम रिळची गरच भासेल, जो सुमारे 80 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे.

 

किती होईल कमाई
जर तुम्ही वर्षातील 300 दिवस काम केले तर त्या दिवसात 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार होऊ शकतात.
बाजारात ते सुमारे 30 पैसे प्रति कप किंवा ग्लास विकले जाऊ शकतात. अशा प्रकारे यातून मोठा नफा होईल.

 

Web Title :- Earn Money | business idea start disposal paper cup manufacturing with low investment earn lakhs of rupees every month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा