आर्थिकताज्या बातम्या

Earn Money | नोकरीसोबत एका छोट्या खोलीत सुरू करा ‘हा’ बिझनेस, खर्चाच्या 10 पट होईल जबरदस्त कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुम्ही एखादा उद्योग करण्याचा विचार करत असाल तर फ्रोजन मटरच्या उद्योगात (Frozen Green Peas Business) तुम्हाला मोठी कमाई (Earn Money) होऊ शकते. शेतकर्‍यांकडून मटर खरेदी करून तुम्ही बिझनेस करू शकता. मटरची मागणी पूर्ण वर्षभर असते. परंतु याची उपलब्धता केवळ थंडीत असते.

 

या उद्योगात सर्वप्रथम भरपूर मटर खरेदी करा. तुम्हाला किती मोठा व्यवसाय करायचा आहे त्यावर मटर खरेदी ठरवू शकता. बाजार रिसर्च करून एक अंदाज लावावा लागेल की, वर्षभरात तुम्ही किती फ्रोजन मटर विकू शकता.

 

फ्रोजन मटरचा व्यवसाय आपल्या घराच्या एका छोट्या खोलीतून सुरू करू शकता. मात्र, मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा असेल तर 4000 ते 5000 वर्ग फुट जागेची आवश्यकता आहे. तर, छोट्या स्तरावर बिझनेस सुरू केल्यास हिरवी मटर सोलण्यासाठी काही मजूरांची गरज असेल. मोठ्या प्रमाणात तुम्हाला मटर सोलण्याचे मशीन घ्यावे लागेल. सोबत काही लायसन्ससुद्धा हवेत.

कशी होईल कमाई
फ्रोजन मटरचा बिझनेस सुरूकेल्यास किमान 50-80 टक्केपर्यंत नफा मिळू शकतो. शेतकर्‍यांकडून 10 रुपये प्रति किग्रॅच्या दराने हिरवी मटर खरेदी करू शकता. यामध्ये दोन किग्रॅ हिरव्या मटरमध्ये सुमारे 1 KG दाणे निघतात.

 

जर तुम्हाला बाजारात मटर 20 रूपये प्रति किलोग्रॅमने मिळाली तर तुम्ही मटर दाण्यांवर प्रोसेस करून घाऊकमध्ये 120 रुपये प्रति किग्रॅच्या भावात विकू शकता. तसेच, तुम्ही फ्रोजन मटरचे पॅकेट्सचे थेट रिटेल दुकानदारांना विकलेत तर तुम्हाला याचा लाभ 200 रुपये प्रति किग्रॅ पॅक मिळू शकतो. (Earn Money)

 

जाणून घ्या कसे तयार होते फ्रोजन मटर
फ्रोजेन मटर बनवण्यासाठी सर्वप्रथम मटर सोलली जाते.
यानंतर मटर सुमारे 90 डिग्री सेंटिग्रेटच्या तापमानात उकडली जाते.
नंतर मटर दाणे 3-5 डिग्री सेंटिग्रेट थंड पाण्यात टाकले जातात, जेणेकरून यामध्ये बॅक्टेरिया मरावेत.
यानंतर हे मटर सुमारे 40 डिग्री तापमानात ठेवले जातात. यामुळे मटरमध्ये बर्फ जम होतो.
नंतर मटर दाण्याचे वेगवेगळ्या वजनाचे पॅकेट्स पॅक करून बाजारात पाठवले जातात.

 

Web Title :- Earn Money | business idea start frozen green peas business earn up to 10 times from cost

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘घराणेशाही जपणार्‍या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही’

Pune Cyber Crime | पुण्यात आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल; 100 पैकी 92 प्रश्न सारखे असल्याचे तपासणीत निष्पन्न

Back to top button