Earn Money | नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहिना होईल रू. 2 लाखापर्यंत कमाई; सरकार देईल 90% मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | वाढत्या महागाईत, जर नोकरीच्या ठराविक पगारात तुमचे भागत नसेल आणि तुम्ही अतिरिक्त उत्पन्नासाठी (Extra income) व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर कमी पैशात तुम्ही स्वत:चा व्यवसाय (Start own Business) सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला एक सुपरहिट बिझनेस आयडिया (Superhit Business Idea) सांगणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही दरमहा 2 लाख रुपये कमवू शकता. (Earn Money)

 

हा व्यवसाय शेळीपालन (Goat Farming Business) चा आहे. शेळीपालन व्यवसाय हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय (Profitable Business) आहे आणि भारतातील लोक शेळीपालन (Goat Rearing) व्यवसायातून खूप पैसे (Earn money) कमावतात.

 

हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. हा व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि पोषणात मोठा हातभार लावतो. शेळीपालन (Goat Farm) हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेळीपालनापासून दूध, खत इत्यादीचे अनेक फायदे आहेत.

सरकार देईल 90 टक्केपर्यंत अनुदान
हा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आहे. सरकारी मदत घेऊन तुम्ही याची सुरुवात करू शकता. ग्रामीण भागात पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वयंरोजगाराचा अवलंब करण्यासाठी हरियाणा सरकार पशुपालकांना 90 टक्क्यांपर्यंत सबसिडी (Government Subsidy) देत आहे. त्याचबरोबर इतर राज्य सरकारही अनुदान देतात.

भारत सरकार पशुसंवर्धनासाठी 35% पर्यंत अनुदान देते. शेळीपालन सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही बँकांकडून कर्ज घेऊ शकता. NABARD तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज देते.

 

किती येईल खर्च
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जागा, खाद्य, ताजे पाणी, आवश्यक मजुरांची संख्या, पशुवैद्यकीय सहाय्य, बाजारपेठ आणि निर्यात क्षमता याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधापासून ते मांसापर्यंत मोठी कमाई होते. बाजारात शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे.

त्याच वेळी, शेळीचे मांस सर्वोत्तम मांसांपैकी एक आहे ज्याची घरगुती मागणी खूप जास्त आहे. हा काही नवीन व्यवसाय नाही, ही प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरू आहे.

 

किती होईल कमाई
शेळीपालन प्रकल्प हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे.
एका अहवालानुसार, 18 मादी बकरीमधून सरासरी 2,16,000 रुपये उत्पन्न मिळू शकते.
त्याच वेळी, बोकडापासून सरासरी 1,98,000 रुपये मिळू शकतात.

 

Web Title :- Earn Money | business idea start goat farming with low investment and earn 2 lakh rupees per month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा