Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

नवी दिल्ली : Earn Money | कोरोना महामारी (Coronavirus Pandemic) मुळे अनेक लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. या दरम्यान अनेक लोकांनी आपला छोटा-मोठा व्यवसाय सुरू (Starting own business) केला. जर तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही एक चांगली बिझनेस आयडिया (Business idea) सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही महिन्याला मोठी कमाई (Earn Money ) करू शकता. आज आम्ही शेतकर्‍यांना चंदनाच्या शेती (sandalwood cultivation) बाबत सांगणार आहोत.

चंदनाला मागणी (sandalwood demand) आपल्या देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. चंदनाच्या शेतीत तुम्ही जेवढे पैसे खर्च करता त्याच्या कितीतरी पट जास्त नफा होतो. यामध्ये खर्च जवळपास एक लाख रुपये येतो आणि नफा 60 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो.

तरूण नोकरी सोडून करत आहेत हा व्यवसाय

चंदनाच्या शेतीने बंपर नफा होतो. यामुळे तरूणांचा कल याकडे आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगड (Pratapgarh) मध्ये उत्कृष्ट पांडेय हे अधिकार्‍याची नोकरी सोडून गावात चंदन लागवड करून चांगली कमाई करत आहेत.

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

सशस्त्र सीमा दलात (SSB) मध्ये असिस्टंट कमांडंट पदाचा राजीनामा देऊन उत्कृष्ट पांडेय गावात चंदन-हळदीची शेती करत आहेत. हरियाणामध्ये शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी चंदनाच्या शेतीचा पहिला प्लांट लावला. सुरेंद्र कुमार यांनी 2 एकरमध्ये चंदनाची रोपे लावली आहेत. सुरेंद्र यांच्यानुसार, चंदनाच्या शेतीसाठी प्रति एकर सुमारे 4 लाख रुपयांचा खर्च आला आणि 10 वर्षानंतर प्रति एकर सुमारे 1 कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे.

कशी करावी चंदनाची शेती

चंदनाची झाडे दोन पद्धतीने तयार केली जातात. एक ऑर्गेनिक (organic farming) आणि दुसरी पारंपारिक पद्धतीने.
ऑर्गेनिक पद्धतीने चंदनाची झाडे तयार करण्यात सुमारे 10 ते 15 वर्ष लागतात.
तर पारंपारिक पद्धतीने सुमारे 20 ते 25 वर्षांचा काळ लागतो. चंदनाचे झाड खुप महाग मिळते.

भारतात चंदनाचे लाकूड जवळपास 8-10 हजार रुपये किलोने मिळते.
तर परदेशात अनेकदा याची किंमत 20-25 हजार रुपये असते.
एका झाडात जवळपास 8-10 किलो लाकूड सहज मिळते.
तर जमीनीनुसार एक एकरमध्ये चंदनाच्या झाडातून 50 ते 60 लाखापर्यंत कमाई केली जाऊ शकते.

हे देखील वाचा

Pune Swimming Pool | पुण्यातील जलतरण तलाव खुले, पण… – अजित पवार (व्हिडीओ)

Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपची युती होणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | business opportunities start sandalwood cultivation with rs 1 lakh investment and earn rs 60 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update