Earn Money | कमाईची गोष्ट ! 2 लाख रुपये गुंतवून ‘या’ कंपनी सोबत सुरू करा बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांची कमाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही बिझनेस करण्याच्या विचारात असाल तर आम्ही एक असा बिझनेस (Business Opportunity) सांगणार आहोत जो सुरू करून तुम्ही मोठी कमाई (Earn money) करू शकता. डेयरी प्रोडक्ट बनवणारी कंपनी अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूल फ्रेंचायजी (Amul franchise) ऑफर करत आहे. यातून छोट्या गुंतवणुकीत दरमहिना नियमित कमाई केली जाऊ शकते. अमूलची फ्रेंचायजी घेणे फायद्याचा (Earn Money) सौदा आहे. यामध्ये नुकसान नाहीच्या बरोबर आहे.

2 लाखापासून सुरू करू शकता बिझनेस
अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेयरिंगशिवाय फ्रेंचायजी ऑफर करत आहे. एवढेच नव्हे, अमूलची फ्रेंचायजी घेण्याचा खर्च सुद्धा खुप जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरूवातीपासूनच चांगला फायदा होऊ शकतो. फ्रेंचायजी द्वारे दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र, हे जागेवर अवलंबून आहे.

कशी घ्यावी लागेल फ्रेंचायजी
अमूल दोन प्रकारची फ्रेंचायजी ऑफर करत आहे. पहिली अमूल आउटलेट, अमूल पार्लर किंवा अमूल क्युऑस्कची फ्रेंचायजी आणि दुसरी अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी. जर तुम्ही पहिल्यामध्ये गुंतवणूक केली तर 2 लाख रुपये गुंतवावे लागतील.

जर दुसर्‍या फ्रेंचायजी बाबत विचार करत असाल तर 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये द्यावे लागतील.

 

एवढे मिळते कमीशन

अमूल आऊटलेट घेतल्यानंतर कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजे एमआरपीवर कमीशन देते. यामध्ये एका मिल्क पाउचवर 2.5 टक्के, मिल्क प्रॉडक्ट्सवर 10 टक्के आणि आयस्क्रीमवर 20 टक्के कमीशन मिळते.

अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी घेतल्यास रेसिपी बेस्ड आयस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकेलेट ड्रिंक वर 50 टक्के कमीशन मिळते.
तर, प्री-पॅक्ड आयस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

एवढ्या जागेची आवश्यकता
जर तुम्ही अमूल आउटलेट घेतले तर तुमच्याकडे 150 चौ.फु. जागा असायला हवी.
तसेच, अमूल आयस्क्रीम पार्लरची फ्रेंचायजीसाठी किमान 300 चौ.फु. जागा असावी.

असे करा अप्लाय
जर तुम्हाला फ्रेंचायजीसाठी अप्लाय करायचे असेल तर तुम्हाला [email protected] वर मेल करावा लागेल.
याशिवाय या लिंक http://amul.com/m/amul-scooping-parlours वर जाऊन सुद्धा माहिती घेता येईल.

Web Titel :- Earn Money | business opportunity amul offers franchise just rupees 2 lakh and earn 5 lakh rupees monthly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार’

PM kisan Samman Nidhi | 6,000 रुपये आणि इतर फायदे घेण्यासाठी या सरकारी अ‍ॅपद्वारे करा रजिस्ट्रेशन

Supreme Court | कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला मिळणार, कारणही असेल ‘नमूद’; मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या कोणती प्रकरणे मानली जातील ‘कोविड डेथ’