Earn Money | अतिशय कमी पैशात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिना 2 लाखापर्यंत होईल कमाई; सरकार सुद्धा करते मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही कमाई करण्याचा (How to earn money?) विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक चांगली बिझनेस आयडिया (New Business Idea) सांगणार आहोत. जिथे तुम्ही केवळ 25,000 रुपये वार्षिक खर्च करून सरासरी 1.75 लाख रुपये कमाई (Profitable business) करू शकता. हा मत्स्य पालनाचा (Fish Farming) व्यवसाय आहे. सध्या शेतकरी भाजीसह मासे पालन सुद्धा करत आहेत.

सरकार सुद्धा मासे पालन व्यवसायाला प्रोत्साहन (Fisheries Business) देत आहे. अलिकडेच मासे पाळणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने यास कृषी (Agri) चा दर्जा दिला आहे. राज्य सरकार मासे पालन करणार्‍या शेतकर्‍यांना विना व्याज कर्ज सुविधा देत आहे. सोबतच सबसिडी आणि मच्छीमारांसाठी विमा योजना सुद्धा सरकारकडून मिळते.

जाणून घ्या कशी होईल कमाई?
जर तुम्ही सुद्धा मत्स्य पालन व्यवसायात असाल किंवा तो सुरू करण्याचा विचार करत असाल तर यातील आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला बंपर नफा मिळवून देऊ शकते. होय… मत्स्य पालनासाठी सध्या बायोफ्लॉक तंत्रज्ञान (Fish Farming Business by Biofloc Technique) खुप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक या तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो रूपये कमावत आहेत.

 

कसे काम करते हे तंत्रज्ञान

Biofloc Technique एका बॅक्टेरियाचे नाव आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मत्स्य पालनात मोठी मदत होते. यामध्ये मोठ-मोठ्या (सुमारे 10-15 हजार लीटर) टाक्यांमध्ये मासे टाकले जातात. या टाक्यांमध्ये पाणी टाकणे, काढणे, त्यामध्ये ऑक्सीजन देणे इत्यादीची चांगली व्यवस्था असते.

बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेला प्रोटीनमध्ये बदलतो, ज्यामुळे मासे ते पुन्हा खातात, यामध्ये एक तृतीयांश खाद्याची बचत होते.
पाणी सुद्धा घाण होत नाही. मात्र, हे थोडे खर्चीक असले तरी नंतर यात नफा सुद्धा खुप मिळतो.

नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड (NFDB) नुसार, जर तुम्ही 7 टँकपासून तुमचा व्यवसाय सुरू केला
तर तो सेटअप करण्यात तुमचे सुमारे 7.5 लाख रुपये खर्च होतील.
मात्र, तुम्ही तलावात मासे पाळून सुद्धा मोठी कमाई करू शकता.

2 लाखापेक्षा जास्त होत आहे उत्पन्न
एका छोट्या गावातील शेतकरी गुरबचन सिंह यांच्याकडे केवळ 4 एकर जमीन आहे.
त्यांनी ती विकसित करून 2 एकरमध्ये मत्स्य पालन सुरू केले.
त्यांनी व्यवसायाची सुरूवात एका तलावात मासे पालन करून केली.

सिंह म्हणाले, मी जवळपास 10 वर्षापूर्वी मासे पालनावर एक रेडिया कार्यक्रम ऐकला होता आणि पारंपरिक कृषी पद्धत सोडून काही नवीन करण्याचा विचार केला होता.
मी मोगा शहरात जिल्हा मत्स्य विभागाशी संपर्क केला.
मत्स्य अधिकार्‍यांनी मला मासे पालनावर पाच दिवसांचे ट्रेनिंग दिले.
गुरबचन आता अडीच एकरात मासे पालन करून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होत आहे.

Web Titel :- Earn Money | business opportunity start fish cultivation with low investment and monthly earn 2 lakh rupees check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Earn Money | कमाईची गोष्ट ! 2 लाख रुपये गुंतवून ‘या’ कंपनी सोबत सुरू करा बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांची कमाई, जाणून घ्या

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार’