Earn Money | घरबसल्या 2 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 1 लाख रुपयांपर्यंत कमाई; जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : Earn Money | जर तुम्हाला तुमचा छोटा व्यवसाय सुरू करायचा (Start own business) असेल तर आज आम्ही एक चांगली आयडिया (Business idea) देत आहोत. ज्यामध्ये आपल्या घरीच स्वदेशी प्रॉडक्टचे उत्पादन करून लाखो रुपये कमावू शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये कोणतीही मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही. कमी पैशात हा व्यवसाय सुरू करू शकता. (Earn Money)

जर तुमच्याकडे तुमची जमीन असेल आणि कमी गुंतवणुकीत आपला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही फ्लाय अ‍ॅश ब्रिक्स (Fly Ash Bricks) म्हणजे राखेच्या विटा बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

फ्लाय अ‍ॅश ब्रिकला सामान्यपणे सीमेंटची विटसुद्धा म्हटले जाते. यासाठी 100 फुट जमीन आणि किमान 2 लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. यावर तुम्ही महिन्याला एक लाखापर्यंत कमाई करू शकता. (Earn Money)

रोज 3 हजार विटांचे होऊ शकते उत्पादन

वेगाने होत असलेल्या शहरीकरणात बिल्डर फ्लाय अ‍ॅश विटांचा वापर करत आहेत. या विटा वीज प्रकल्पातून निघणारी राख, सिमेंट आणि स्टोन डस्टचे मिश्रण करून बनवल्या जातात. या व्यवसायासाठी गुंतवणुकीचा बहुतांश भाग मशीनसाठी खर्च होतो.

ही मॅन्युअल मशीन सुमारे 100 फुट जमीनीत लावता येऊ शकते. या मशीनद्वारे विट उत्पादनासाठी 5 ते 6 लोकांची आवश्यकता असते.
यामध्ये रोज सुमारे तीन हजार विटांचे उत्पादन होऊ शकते. या गुंतवणुकीत कच्च्या मालाच्या खर्चाचा समावेश नाही.

10 ते 12 लाखात ऑटोमॅटिक मशीन

या व्यवसायात ऑटोमॅटिक मशीन जास्त कमाई करून देऊ शकते.
तिची किंमत 10 ते 12 लाख रूपये आहे. ही मशीन 1 तासात 1 हजार विटा बनवते. महिन्याला 3 ते 4 लाख विटांचे उत्पादन होते.

येथून घेऊ शकता कर्ज

या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकते. पंतप्रधान रोजगार योजना आणि मुख्यमंत्री युवा स्व-रोजगार योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. तसेच मुद्रा लोनचा पर्याय सुद्धा आहे.

कमी मातीच्या विटांची मागणी

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मातीची कमतरता असल्याने विटांचे उत्पादन होत नाही.
यासाठी येथे उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब सारख्या राज्यांतून विटा मागवल्या जातात, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढतो.

अशावेळी डोंगराळ भागात या मशीनद्वारे स्टोन डस्ट आणि सीमेंट विटा बनवण्याचा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.
डोंगराळ भागात स्टोन डस्ट सहज उपलब्ध होत असल्याने याच्या खर्चात घट होते आणि तुमची बचत सुद्धा जास्त होते.

हे देखील वाचा

Mahindra Centuro खरेदी करा 24 हजारात, 85 kmpl च्या मायलेजसह मिळेल 12 महिन्यांची वॉरंटी;

Pune Crime | …म्हणून ‘कात्रजचा खून झाला’, खून का झाला याचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | business opportunity start fly ash bricks with 2 lakh investment and earn 1 lakh per month check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update