तुमच्याकडील ‘हे’ 25 पैशांचे नाणे तुम्हाला बनवेल ‘लखपती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना वेगवेगळे छंद असतात. कुणाला नोटा जमवण्याचा, तिकिट जमा करण्याचा तर काहींना जुनी नाणी (old coins) जमवण्याचा विशेष छंद असतो. जुनी-नवी सर्व प्रकारची नाणी अनेक जण जपून ठेवतात. तुम्हाला देखील असाच छंद असेल आणि काही वर्षांपूर्वी चलनात असणारं 25 पैशांचं नाणं तुम्ही जपून ठेवलं असेल तर तुमच्यासमोर लखपती बनण्याची संधी आहे. तुम्ही 25 पैशांचं हे नाण विकून लखपती होऊ शकता. याकरता तुम्हाला विशेष मेहनत करण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे हे नाणं असल्यास थेट 1.5 लाख रुपये तुमचे होतील.

तुम्हाला या अँटिक नाण्याचा फोटो वेबसाईटवर पोस्ट करावा लागेल. ज्यानंतर हे नाणं विकत घेऊ इच्छिणारी व्यक्ती तुमच्या नाण्यावर बोली लावतील आणि तुम्हाला हवं त्यांना हे नाणं विकता येईल. जाणून घ्या अशाप्रकारे लखपती होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या 25 पैशांच्या नाण्याची आवश्यकता आहे. ज्यातून तुम्ही भरभक्कम कमाई करु शकता.

कोणतं नाणं बनवेल तुम्हाला लखपती ?

मीडिया अहवालांच्य मते, इंडिया मार्ट बेवसाईटवर जुन्या नोटा आणि नाण्यांचा लीलाव होत आहे. अशाप्रकारे नोटा-नाणी गोळा करण्याचा तुम्हाला छंद असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. याकरता तुमच्याकडे 25 पैशांचं नाणं असलं पाहिजे जे चंदेरी (silver) रंगाचं असेल. हे नाणं लीलावात विकून तुम्ही 1.5 लाखापर्यंत रक्कम मिळवू शकता. याशिवाय या नाण्यांच्या विक्रीवेळी तुम्ही मोलभाव देखील करु शकता.

कुठे विकायची नाणी ?

मीडिया अहवालानुसार इंडिया मार्टवर ही नाणी विकून चांगली रक्कम घरबसल्या मिळवू शकता. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही नाणी विकू शकता.

5 आणि 10 रुपयांची नाणी विकून होईल कमाई

इंडिया मार्ट वेबसाईटवर (indiamart website) होणाऱ्या जुन्या नाण्यांच्या आणि नोटांच्या लिलावामध्ये तुम्ही 5 किंवा 10 रुपयांची नाणी विकू शकता. मात्र, या नाण्यांवर वैष्णो देवी असायला हवी. वैष्णो देवी असणारी नाणी 2002 मध्ये जारी करण्यात आली होती.देवी असल्याने या नाण्यांना लोक नशिबवान मानतात आणि त्यामुळे या नाण्यांसाठी लोक लाखो रुपये खर्च करत आहेत.

या नोटा मिळवून देतील 25 हजार रुपये

ब्रिटीशकालीन भारतात अशा काही नोटा चलनात होत्या, ज्याबद्दल आता अनेकांना माहितही नसेल. आधीच्या काळात 10 च्या नोटेवर अशोक स्तंभ होता. ही नोट आता दुर्लक्ष झाली आहे. मत्र, जर तुमच्याकडे अशा प्रकारची नोट असेल तर तुमचे नशीब चमकू शकते. या नोटांच्या बदल्यात तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये मिळू शकतात.

या वेबसाईटवर विका नाणी आणि नोटा

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

You might also like