Earn Money | केवळ 53,000 रुपयात ‘हा’ बिझनेस सुरू करून कमवा 35 लाख, सरकार सुरूवातीपासून मार्केटिंगपर्यंत करेल मदत

नवी दिल्ली : Earn Money | जर तुम्ही सुद्धा बिझनेस करून दरमहिना मोठी कमाई (Earn Money) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही कडकनाथ कोंबडी पालन (Kadaknath Murga) व्यवसायाबाबत सांगणार आहोत. या काळ्या रंगाच्या कोंबड्याने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

औषधी गुणांमुळे भरपूर मागणी

याचा सर्वात मोठा व्यवसाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये केला जातो. आदिवासी भागात यास कालीमासी म्हटले जाते. हा कोंबडा पूर्णपणे काळा असतो. त्याचे मांस आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. आपल्या औषधी गुणांमुळे कडकनाथ कोंबड्यांना भरपूर मागणी आहे. यामुळे या व्यवसायातून मोठी कामाई (Earn Money) होऊ शकते.

मागणी भरपूर असल्याने जबरदस्त कमाई

कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगढसोबतच देशाच्या अनेक राज्यांमध्ये होत आहे. यातून होणार्‍या कमाईचा अंदाज या गोष्टीवरून लावता येतो की, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढचे कृषी विज्ञान केंद्र वेळेवर कडकनाथ कोंबडीची पिल्ले वेळेवर उपलब्ध करू शकत नाहीत.

कडकनाथला मिळाला जीआय टॅग

कडकनाथ कोंबड्याची उत्पत्ती मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात झाली आहे. याच्यामुळे मध्य प्रदेशच्या कडकनाथ कोंबड्याला जीआय टॅग (GI Tag) सुद्धा मिळाला आहे. या टॅगचा अर्थ आहे की कडकनाथ कोंबड्यासारख्या दुसरा कोंबडा नाही.

का महाग आहे कडकनाथ?

कडकनाथ कोंबडा आणि कोंबडीचा रंग काळा, मांस काळे आणि रक्तसुद्धा काळे असते. या कोंबड्याच्या मांसात आयर्न आणि प्रोटीन सर्वात जास्त आढळते. तसेच मांसात फॅट आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी असते.

Punjab Assembly Election | अभिनेता सोनू सूदची बहीण पंजाब विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

हृदय, मधुमेहाच्या रूग्णांना लाभदायक

यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या रूग्णांना हे मांस लाभदायक मानले जाते. याच्या सेवनाने भरपूर पोषक तत्व मिळतात. मागणी आणि फायदे पाहता सरकार सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत करत आहे.

सरकार कशाप्रकारे करते मदत?

कडकनाथ कोंबडी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ सरकार अनेक योजना चालवत आहे. छत्तीसगढमध्ये केवळ 53,000 रुपये जमा केल्यानंतर सरकारकडून ती हप्त्यात 1000 पिल्ले, 30 कोंबड्यांच्या शेड आणि सह महिन्या महिन्यापर्यंत मोफत खाद्य उपलब्ध करून दिले जात आहे.

मार्केटिंगचे काम सुद्धा सरकार करते

तसेच लसीकरण आणि देखभालीची जबाबदारी सुद्धा सरकार घेत आहे. कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर मार्केटिंगचे काम सुद्धा सरकार करते. मध्य प्रदेश सरकारकडून कोंबडी पालनासाठी योजना चालवली जात आहे.

कसा सुरू करावा कोंबडी पालन व्यवसाय?

कडकनाथ कोंबडी पालन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून पिले घेऊ शकता.
काही शेतकरी 15 दिवसांची पिले घेतात, तर काही लोक एक दिवसांची पिले घेतात.
कडकनाथची पिले साडेतीन ते चार महिन्याच्या आत विक्रीसाठी तयार होतात.

इतका आहे पिलांचा आणि अंड्याचा दर

कडकनाथ कोंबडीच्या पिलांचा दर 70-100 रुपयांच्या दरम्यान आहे.
याच्या एका अंड्याचा दर 20-30 रुपयांपर्यंत असतो.

किती होईल नफा?

बाजारात एक कडकनाथ कोंबड्याची किंमत 3,000-4,000 रुपये असते. त्याचे मांस 700-1000 रुपये प्रति किग्रॅम पर्यंत विकले जाते.
हिवाळ्यात मांसाची मागणी वाढल्याने मांसाची किंमत 1000-1200 रुपये किलोपर्यंत पोहचते. (Earn Money)

35 लाख रुपयांपेक्षा जास्त कामाई

समजा सरकारकडून 1000 पिले 53,000 रुपयांत खरेदी केली.
एक कोंबड्यात सरासरी 3 किग्रॅ मांस निघते तर हिवाळ्यात तुम्ही 35 लाख रुपयांपेक्षा जास्त कामाई करू शकता.
यामध्ये तुम्हाला 6 महिन्यापर्यंत त्यांचे खाद्य आणि शेड बनवण्यासाठी खर्च येत नाही.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Earn Money | earn 35 lakhs rupees by starting business in just 53000 rupees and government will also help check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update