Earn Money | सरकारी बँकांसोबत काम करून दरमहा कमावू शकता 5000 रुपये, जाणून घ्या कुठे आणि कसा करावा अर्ज?

नवी दिल्ली : Earn Money | तुम्हाला दरमहिला एक फिक्स्ड इन्कम (Earn money) पाहिजे असेल तर चांगली आयडिया आहे. जिथे तुम्ही एखाद्या सरकारी बँकेच्या माध्यमातून दरमहिना चांगली कमाई करू शकता. सरकारी बँका बँकिंग सर्व्हिस (Banking Service) सोबतच सामान्य लोकांना आपल्या सोबत घेऊन कमावण्याची संधी सुद्धा देतात.

तुम्हाला एखाद्या सरकारी बँकेसोबत (Government Bank) कमाई करायची असेल तर तुम्ही बँक मित्र (Bank Mitra) बनू शकता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक वेळोवेळी बँक मित्रसाठी (Bank Mitra) अर्ज मागवते. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात

Pune Corporation | निविदा काढल्या नसतानाही ‘एक कोटी’ रुपयांच्या कामांची बिले सादर ! कोरोना काळात ‘स्मशानभूमीतील’ कामांच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर ‘दरोड्याचा प्रयत्न’; जाणून घ्या प्रकरण

 

दरमहिना होईल 5000 रुपये कमाई

बँक मित्र बनल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारे कमाई करू शकता. कोणत्याही व्यक्तीचे खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, त्याच्या क्रेडिट कार्डचे आणि बिलाचे पेमेंट केल्यानंतर बँक मित्राला कमीशन (Earn Money) दिले जाते.

पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) अंतर्गत, सर्व बँक मित्रांना 1.25 लाख रुपयांचे कर्जसुद्धा दिले जाते, ज्यामध्ये 50,000 रुपयांचे कर्ज सामान इत्यादीसाठी, 25,000 रुपयांचे कर्ज कामासाठी आणि 50,000 रुपयांचे कर्ज वाहनासाठी दिले जाते. याशिवाय बँक मित्राला दरमहिना 2000 ते 5000 रुपये मानधन म्हणून दिले जातात.

कोण बनू शकतात बँक मित्र

जी व्यक्ती बँक खाते उघडणे, विमा करणे, पैसे जमा करण्यासह इतर बँकेच्या कामात लोकांना मदत (Earn Money) करते त्यांना बँक मित्र म्हणतात.

या कागदपत्रांची असते आवश्यकता

– ओळखपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वोटर आयडी कार्डची कॉपी.

– पात्रतेसाठी 10वी पासचे मार्कशीट आणि वर्तणूक दाखला.

– व्यावसायिक पत्त्यासाठी विज बिल, टेलीफोन बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्टची कॉपी.

– पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक.

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | earn money you can get 5000 rupees per month from bank mitra scheme check how  process here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update