Earn Money | सरकारच्या मदतीने केवळ 5 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : Earn Money | जर तुम्हाला कमी भांडवलात (Low investment) चांगले इन्कम (Earn Money) देणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही एक चांगला ऑपशन सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही 5000 रुपयांच्या छोट्या रक्कमेतून व्यवसाय सुरू करू शकता. इतकेच नव्हे, सरकार (modi Gov scheme) सुद्धा या व्यवसायासाठी मदत करत आहे. भारतात एक मोठी लोकसंख्या चहाची शौकीन आहे. रेल्वे स्टेशनवर, बस डेपो आणि विमानतळावर कुल्हडच्या चहाची मागणी सतत वाढत आहे. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा (Kulhad making business) आणि विकण्याचा व्यवसाय करूशकता.

इलेक्ट्रिक चाक पुरवते सरकार

मोदी सरकारने कुल्हड बिझनेस वाढवण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुंभारांना वीजेवर चालणारे चाक दिले जाते. नंतर तयार कुल्हड खरेदी सुद्धा केले जातात.

5 हजार लावू सुरू करू शकता व्यवसाय

हा बिझनेस अतिशय कमी खर्चात सुरू होऊ शकतो. यासाठी थोडी जागा आणि 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी माहिती दिली की, यावर्षी सरकारने 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले.

कशी आणि किती होईल कमाई?

चहाच्या कुल्हडचा भाव सुमारे 50 रुपये शेकडा आहे. अशाच प्रकारच्या लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आणि प्याली 100 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यास यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो.

करू शकता चांगली बचत

सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा असते. जर बिझनेस योग्यप्रकारे
चालवला आणि कुल्हड विकण्याकडे लक्ष दिले तर 1 दिवसात 1,000 रुपयांची बचत केली जाऊ
शकते.

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar द्वारे किती मोबाइल नंबर आहेत रजिस्टर्ड? ‘या’ वेबसाइटवरून तपासा; 2 राज्यांमध्ये मिळेल विशेष सुविधा

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘संजय राऊतांमुळे शिवसेना खड्डयात, ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | earning money opportunity start kulhad making business with low investment and earn 50k monthly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update