Earn Money | यंदा गुंतवणुकदारांची कमाई झाली 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, आकड्यांवरून जाणून घ्या प्रगतीची आलेख; तुम्ही देखील घेऊ शकता लाभ

नवी दिल्ली : Earn Money | इक्विटी मार्केटच्या यशाची चव गुंतवणुकदार भरपूर चाखत आहेत. त्याचे कारण आहे की, यावर्षी गुंतवणुकदारांच्या झोळीत तब्बल 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आले आहेत. विशेष बाब ही आहे की, हा फायदा या एका वर्षात एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो. तज्ज्ञांनुसार, या वर्षात सेन्सेक्स 60 हजार आणि निफ्टी 20 हजारपर्यंत जाऊ शकतो. अखेर गुंतवणुकीदारांना कशाप्रकारे कमाई (Earn Money) झाली आहे ते जाणून घेवूयात…

विक्रमी स्तरावर शेयर बाजार
सध्या शेयर बाजार विक्रमी स्तरावर आहे. तर 31 डिसेंबरला जेव्हा बाजार बंद झाला होता तेव्हा मुंबई स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 47,751.33 अंकावर बंद झाला होता. तर 3 सप्टेंबरला जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा तो 58129.95 अंकावर होता.

या दरम्यान सेन्सेक्समध्ये 10378.62 अंकाची तेजी पहायला मिळाली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक निफ्टी 50 31 डिसेंबरला 13,981.75 अंकावर होता. तर 3 सप्टेंबरला निफ्टी 17323.60 अंकांवर पोहचला. या दरम्यान निफ्टीत 3341.84 अंकांची उसळी दिली आहे.

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

सेन्सेक्सचे मार्केट कॅप नवीन स्तरावर
तर दुसरीकडे सेन्सेक्सचे मार्केट कॅपसुद्धा नवीन लेव्हलवर पोहचले. सध्या 2,54,21,578.88 कोटी रुपयाच्या पुढे गेले आहे. मागील आठ महिन्यात सेन्सेक्सच्या मार्केट कॅपमध्ये 6618560.28 कोटी रुपयांची वाढ दिसून आली होती.

विशेष म्हणजे 31 डिसेंबर 2020 ला बीएसईचे मार्केट कॅप 1,88,03,518.60 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तसेच बीएसईच्या मार्केट कॅपमधील वाढ गुंतवणुकदारांची कमाई दर्शवते.

या आर्थिक वर्षात काय होती स्थिती
जर फिस्कल ईयर म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 बोलायचे तर पाच महिन्यात गुंतवणुकदारांच्या कमाईत
कोणतीही घसरण पहायला मिळाली नाही. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 31 मार्च 2021
ला सेन्सेक्स मार्केट कॅप 2,04,30,814.54 कोटी रुपये होते.

या पाच महिन्यांत गुंतवणुकदारांच्या खिशात 4990764.34 कोटी रुपये आले आहेत. तज्ज्ञांनुसार, आगामी काळात गुंतवणुकदारांना आणखी फायदा होऊ शकतो.

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Police | मौजमजा करण्यासाठी कट रचून टाकला दरोडा, फिर्यादीच निघाला चोर ! पिस्टलसह 4.5 लाखांचा ऐवज जप्त

Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | investors earned more than rs 66 lakh crore this year know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update