Earn Money | आता नोकरीचं नो-टेन्शन ! लवकर सुरू करा छोटा बिझनेस, कमवा रोज 3000 रुपयांपेक्षा जास्त ! जाणून घ्या

नवी दिल्ली : Earn Money | कोरोना व्हायरस महामारीमुळे लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, तर अनेकांचे पगार कमी झाले आहेत. नवीन नोकर्‍या मिळत नसल्याने तरूणवर्ग अस्वस्थ आहे. अशावेळी सरकारच्या आर्थिक मदतीच्या योजनांचा आधार घेऊन छोटा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही (Earn Money) बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

रोज चांगली कमाई करण्यासाठी तुम्ही कोंबडी पालन करू शकता, ज्यासाठी सरकार सुद्धा मदत करत आहे. हा व्यवसाय 5-9 लाख रुपयात सुरू केला जाऊ शकतो. छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांनी लेखर फार्मिंगची सुरुवात केले तर तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये दर महिना कमावू शकता.

1500 कोंबड्यांचे पालन

पॉल्ट्री फार्मिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल. यानंतर पिंजरे आणि इक्विपमेंटवर जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील. या व्यवसायात अंड्यांतून सुद्धा चांगली कमाई होईल. देशात अंड्याचे दर वाढत आहेत.

Petrol-Diesel Price | खुशखबर! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून मिळू शकतो दिलासा, सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

इतका येईल खर्च

एका लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषध यावर खर्च करावा लागतो.

वार्षिक इतके लाख रुपये कमवा

लागोपाठ 20 आठवडे कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये होईल. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात. 20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.

4 लाख अंडी विकू शकता

अशावेळी 1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात.
बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते. वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

25 ते 35 टक्के सबसिडी

तसेच, पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते.
एससी-एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते.
या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

हे देखील वाचा

RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !

Chandrapur News | फिल्मी लव्ह स्टोरी ! तरुणीनं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं, अन्…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earn Money | job tension over start small business soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update