केंद्र सरकार करणार सहकार्य; व्यवसाय करण्यासाठी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकरने सरकारने एका लहान व्यवसायासंदर्भात माहिती दिली आहे. जी व्यक्ती एखादा लहान उद्योग करू इच्छित असेल तर त्यांच्यासाठी अल्प गुंतवणूकीच्या व्यवसायामधून प्रत्येक महिन्याला चांगला फायदा यामधून होणार असल्याचे स्पस्ष्ट केले आहे. तर देशात चहा घेण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यामध्ये कुल्हड चहा हा जादा प्रसिद्ध आहे. तर यामधून अनेक लोंकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. तर याआधी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडमधून चहा देण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक आणि कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

केंद्र सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत मातीची भांडी तयार करण्यासाठी सरकार कुंभारांना विजेवर चालणारे चाक देते. यानंतर सरकार कुंभारांकडून ते कुल्हड योग्य दरात खरेदी करतात. तर ह्या व्यवसायासाठी कमी जागेसह ५ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तर यंदा सरकार 25 हजार इलेक्ट्रिक चाक वितरीत करणार असल्याचे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सरकार देशांमधून कुल्हड चहाची मागणी वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. तर येत्या काळात देशात प्रत्येक रेल्वे स्टेशनवर कुल्हडमध्येच चहा मिळेल. प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल. असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते. तसेच भारतात जवळपास ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधूनच चहा दिला जात आहे. आगामी काळात प्रत्येक स्टेशनवर फक्त कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना असल्याचाच गोयल यांनी म्हटलं होत. कुल्हडमधील चहा आरोग्यासाठी फायदेशीर असून चहाच्या कुल्हडचा दर सुमारे ५० रुपये आहे. आणि लस्सी कुल्हारची किंमत १५० तर दुधाच्या कुल्हडची किंमत १०० ते १५० रुपये आहे. मागणी वाढल्यास चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे.