फायद्याची गोष्ट ! 5 हजारांची गुंतवणूक अन् लाखो रुपयांचा लाभ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जर तुम्ही नोकरीव्यतिरिक्त छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमचा स्वत:चा असा एक व्यवसाय सुरू करू शकता. आता असाच एक व्यवसाय आहे, ज्यातून दर महिन्याला तुमची चांगली कमाई होईल.

भारतात अधिक प्रमाणात चहाचे सेवन केले जाते. त्यातच कुल्हड चहा हा अधिक प्रसिद्ध आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची वारंवार मागणी केल्याचे पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही कुल्हड चहा तयार करून तो विकण्याचा व्यवसाय करता येतो.

सरकार सध्या कुल्हड चहाची मागणी वाढविण्याकडे लक्ष देत असून, अलीकडेच केंद्रीय रस्ता आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडमधून चहा देण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक व कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी केलीय.

मागील काही दिवासांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, येणार्‍या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळेल. प्लॅस्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल. रेल्वे स्थानकावर प्लॅस्टिक कप पूर्णपणे बंद होणार आहेत.

तसेच सध्या देशात जवळपास 400 रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधून चहा दिला जातोय. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधून चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लॅस्टिकमुक्त भारतमध्ये रेल्वेचे हे योगदान असणार आहे. याचबरोबर या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असेही गोयल यांनी म्हटले होते.

नरेंद्र मोदी सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार कुंभारांना विजेवर चालणारे चाक देत आहेत. त्यावरून ते मातीची भांडी तयार करू शकतात. त्यानंतर सरकार कुंभारांकडून ते कुल्हड चांगल्या किमतीत खरेदी करतात.

विशेष म्हणजे, हा व्यवसाय फारच कमी किमतीत सुरू करता येतोय. यासाठी आपल्याला छोट्या जागेसह 5 हजार रुपयांची गरज आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, यंदा सरकार 25 हजार इलेक्ट्रिक चाक वितरीत करणार आहे.

कुल्हडमधील चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही ती सुरक्षित असते. चहाच्या कुल्हडची किंमत सुमारे 50 रुपये आहे. त्याचप्रमाणे लस्सी कुल्हडची किंमत दीडशे रुपये आहे, दुधाच्या कुल्हडची किंमत 100 रुपये ते दीडशे रुपये आहे. मागणी वाढल्यास चांगली किंमत मिळण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आजच्या काळात शहरात कुल्हडच्या चहाची किंमत 15 ते 20 रुपये असते. जर व्यवसाय योग्य पद्धतीने करायचा ठरवल्यास कुल्हडमधून चांगले उत्पन्न मिळूही शकते. एका दिवसात जवळपास 1 हजार रुपयांची बचत करता येईल.