Earn Money | फक्त 70 हजार रुपये गुंतवून ‘हा’ व्यवसाय सुरू करून करा लाखोंची कमाई, सरकार देणार 30% अनुदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करून तुम्ही लाखो कमवू (Earn Money) शकता. यासाठी छतावर सोलर पॅनल लावावे लागतील. सोलर पॅनल कुठेही बसवता येतात. तुमच्या सोईनुसार छतावर सोलर पॅनल लावून तुम्ही वीज बनवू शकता आणि ग्रीडलाहि पुरवू शकता. केंद्र सरकारचे न्‍यू एंड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालय सौर पॅनेल बसविणाऱ्यांना रूफटॉप सोलर प्लांटवर 30 टक्के अनुदान देत आहे. अनुदानाशिवाय रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो.

 

या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आणि फायद्यांबद्दल जाणून घेऊया

सर्व प्रथम याच्या खर्चाबद्दल पाहुयात .

एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. प्रत्येक राज्यानुसार ह्याचा खर्च वेगवेगळा असतो. मात्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर एक किलो वॅट सोलर प्लांट अवघ्या 60 ते 70 हजार रुपयांमध्ये इन्स्टॉल होते . काही राज्ये यासाठी वेगळे जास्त अनुदान देखील देतात. जर तुमच्याकडे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकाच वेळी 60 हजार रुपये नसेल तर तुम्ही कोणत्याही बँकेकडून गृहकर्ज (home loan) देखील घेऊ शकता. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) सर्व बँकांना गृहकर्ज देण्यास सांगितले आहे.

एक लाख रुपयांपर्यंत होईल कमाई.

तशी तर याची सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी आहे, तरीही तुमच्याकडे या व्यवसायासाठी पैसे नसतील तर अनेक बँका त्यास वित्तपुरवठा करतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत SME कर्ज घेऊ शकता. अंदाजानुसार, हा व्यवसाय एका महिन्यात 30 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत (Earn Money) कमवू शकतो. यासोबतच सौर व्यवसायासाठी अनेक योजनांतर्गत भारत सरकार 30 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या अक्षय ऊर्जा विभागाला भेट देऊन तुम्ही या योजनेची माहिती मिळवू शकता. (Earn Money)

आता या व्यवसायाच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

सोलार पॅनल हे २५ वर्ष चालते. तुम्ही हे पॅनल तुमच्या छतावर सहज उभे करू शकता. आणि पॅनलमधून मिळणारी वीज मोफत असेल. तसेच, तुम्ही शिल्लक राहिलेली वीज ग्रीडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकू शकता. म्हणजे कोणताही खर्च ना करता कमाई सुरु होईल. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले व दिवसातून 10 तास सूर्यप्रकाश भेटला तर ते सुमारे 10 युनिट वीज निर्माण करेल. महिन्याचा हिशोब केला तर दोन किलो वॅट सोलार पॅनल सुमारे 300 युनिट वीज निर्माण करेल.

अशा प्रकारे सोलार पॅनल खरेदी करा.

सोलार पॅनल खरेदी करण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट अथॉरिटी संपर्क साधू शकता.

यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कार्यालये करण्यात आली आहेत.

प्रत्येक शहरात प्राव्हेट डीलर्सकडे देखील सोलर पॅनल उपलब्ध आहेत.

अनुदानाचा फॉर्म अथॉरिटी कार्यालयात मिळतो.

अथॉरिटी कडून कर्ज घेण्यासाठी आधी संपर्क करावा लागेल.

देखभाल खर्च नाही.

सोलर पॅनल मध्ये देखभाल खर्चाचे कोणतेही टेंशन नसते. पण त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी एकदा बदलावी लागते. त्याची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. हे सोलर पॅनल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीहि उभे करू शकतो.

Web Title :-  Earn Money | start a solar panel business for earn money with government help

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stocks 2022 | यंदाच्या वर्षी ‘हे’ 3 स्टाॅक ठरु शकतात ‘मल्टीबॅगर’; जाणून घ्या

 

Apple CEO Tim Cooks Earnings | Apple सोबत CEO टिम कुक साठीही 2021 ठरले चांगले, कमावले ‘इतके’ मिलियन डॉलर्स