Earn Money | नोकरीसह 1 लाख रुपयात सुरू करा हा बिझनेस, महिन्याला होईल 40000 पेक्षा जास्त कमाई, सरकार करेल 80% मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Earn Money | एक असा विशेष बिझनेस (Business Tips) आहे जो तुम्ही कमी पैशात सुरू करून जास्त नफा कमावू (Earn Money) शकता. हा बिस्किटचा बिझनेस (Biscuits business) असून बिस्किट एक अशी वस्तू आहे जिला नेहमी मागणी असते. बिस्किटची मागणी कधीही कमी होत नाही. अशावेळी बेकरी प्रॉडक्ट बनवण्याचे युनिट लावणे चांगला पर्याय (Earn Money) ठरू शकतो.

 

जर तुम्हाला बेकरी इंडस्ट्री (bakery industry) उघडायची असेल तर यासाठी सरकार मदत करत आहे.
मुद्रा स्कीम अंतर्गत बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये गुंतवावे लागतील.
एकुण खर्चाच्या 80 टक्के निधी सरकारकडून मिळेल.
यासाठी सरकारने स्वता प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे.
सरकारने जे बिझनेसचे स्ट्रक्चरिंग केले आहे त्या हिशेबाने तुम्हाला सर्व खर्च कापून गेल्यानंतर दरमहिना 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा (Earn Money) होऊ शकतो.

 

किती येईल खर्च

 

प्रोजक्ट सुरू करण्यासाठी एकुण खर्च 5.36 लाख रुपये येईल, यापैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये लावावे लागतील.
मुद्रा स्कीमअंतर्गत सिलेक्शन झाले तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल. 500 वर्गफुट जागा स्वताची असावी.
जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता.

 

किती होईल नफा

 

5.36 लाख रुपयांत वार्षिक उत्पादन आणि त्याची विक्रीचा अंदाज अशाप्रकारे लावला आहे…

 

4.26 लाख रुपये : संपूर्ण वर्षासाठी कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन

 

20.38 लाख रुपये : संपूर्ण वर्षा इतके प्रॉडक्ट होईल की ते विकल्यानंतर 20.38 लाख रुपये मिळतील.
यात बेकरी प्रॉडक्टची व्रिकी किंमत मार्केटमध्ये मिळणार्‍या इतर आयटम्सच्या आधारावर कमी धरली आहे.

 

6.12 लाख रुपये : ग्रोस ऑपरेटिंग प्रॉफिट

 

70 हजार : अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सेल्सवर खर्च

 

60 हजार : बँकेच्या कर्जाचे व्याज

 

60 हजार : इतर खर्च

 

निव्वळ नफा : 4.2 लाख रुपये वार्षिक

 

मुद्रा स्कीममध्ये करा अर्ज

 

यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (pm mudra yojana) तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये पुढील डिटेल द्याव्या लागतील : नाव, पत्ता, बिझनेस अ‍ॅड्रेस, एज्युकेशन, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज पाहिजे.
यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी सुद्धा द्यावी लागत नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षात परत करू शकता.

 

Web Title : Earn Money | start biscuit making business just rupees 1 lakh and earn 40k per month know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | ‘या’ सेक्टरच्या कर्मचार्‍यांना सुद्धा येणार वाढीव पगार, नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात झालीय वाढ

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

EPFO | बँक अकाऊंटमध्ये आले नसेल PF चे व्याज तर इथं करा तक्रार, मिस्ड कॉलशिवाय SMS द्वारे 1 मिनिटात जाणून घ्या बॅलन्स