Earn Money | केवळ 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्हाला दर महिन्याला 50 हजारांपर्यंत कमवायचे असतील (Earning opportunity) तर आज आम्ही तुम्हाला एका चांगल्या व्यवसायाबद्दल (Business Idea) सांगणार आहोत. तुम्ही तो सहज सुरू करू शकता आणि दर महिन्याला चांगली कमाई (Earn Money) करू शकता.

फक्त 25 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू (Starting own business) शकता आणि त्या बदल्यात तुम्ही दरमहा सुमारे 50 हजार रुपये कमवू शकता. हा व्यवसाय कार वॉशिंग (Car washing business) चा आहे. ते कसे सुरू करावे ते जाणून घेवूयात…

सुरुवात कशी करावी हे जाणून घ्या

कार वॉशिंगची व्यावसायिक मशिन एक लाख रुपयांपर्यंत येते. परंतु, तुमच्याकडे किती गाड्या येऊ शकतील हे महत्वाचे आहे. बाजारात व्यावसायिक मशिन्सची किंमत 12,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये दोन हॉर्सपॉवरची मोटार असलेल्या मशीनची किंमत सुमारे 14 हजार रुपये आहे, ज्यामध्ये पाईपपासून नोझलपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

याशिवाय 30 लिटरचा व्हॅक्यूम क्लिनर घ्यावा लागेल जो जवळपास 9 ते 10 हजार रुपयांना मिळेल. धुण्याचे सामान ज्यामध्ये शॅम्पू, हातमोजे, टायर पॉलिश आणि डॅशबोर्ड पॉलिश पाच लिटरच्या कॅनमध्ये घेतले तर सर्व मिळून सुमारे 1700 रुपये होतील. (Earn Money)

या गोष्टी लक्षात ठेवा

कार वॉशिंग सेंटर उघडण्यासाठी, सर्वप्रथम एक चांगली जागा पाहावी लागेल जिथे एखादी सोसायटी किंवा कार संबंधित गोष्टींसाठी बाजार आहे. कारण तिथे लोकांची वर्दळ जास्त असावी. पार्किंगची जागा असेल, वाहने सहज येऊ शकतील अशा ठिकाणी दुकान घ्या.

दुकान तुमचे असेल तर त्याहूनही चांगले, तुम्ही मेकॅनिकच्या दुकानाचे अर्धे भाडे देऊन वॉशिंगचे काम सुरू करू शकता.
यामुळे पैशांचीही बचत होईल आणि त्या भागात कसा प्रतिसाद मिळतो हेही पाहता येईल.

 

 

अशी होईल कमाई

कार वॉशिंगचे शुल्कही शहरांवर अवलंबून असते. लहान शहरांमध्ये, जिथे अल्टो, वॅगनआर,
क्विड सारख्या छोट्या कार 150 रुपयांना धुतल्या जातात, तर मोठ्या शहरांमध्ये यासारख्या कारसाठी 250
रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. तसेच मोठ्या कार जसे की Swift DZire, Hyundai Verna सारख्या
कारसाठी 350 शुल्क आकारले जाते. आणि SUV साठी 450 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते

 

Web Title :- Earn Money | start car washing business with 25k investment earn rs 50k per month check how

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन, नोव्हेंबरमध्ये 17.5 लाख अकाउंट झालेत BAN, जाणून घ्या सविस्तर

Credit Card | क्रेडिट कार्डचा वापर करताना लक्ष ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान