Earn Money | फक्त एकदाच 2 लाख लावून सुरू करा ‘हा’ बिझनेस, 10 महिन्यानंतर होऊ लागेल 12 लाख रूपयांपर्यंत कमाई; जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Earn Money | जर तुम्हाला स्वताचा व्यवसाय सुरू करायचा (Starting own business) असेल तर आज आम्ही एक शानदार बिझनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत. जो तुम्ही कमी पैशात सुरू करून दरमहिना मोठी रक्कम कमावू (Earn money) शकता, ती सुद्धा खुप कमी वेळात. हा व्यवसाय मिरचीच्या शेतीचा (Green Chilli Farming) आहे. ती चवीला जरी तिखट असली तरी तिच्यातून येणारी कमाई जीवनात गोडवा आणू शकते.

मिरचीच्या शेतीत 2-3 लाख रुपये लावून 9 ते 10 महिन्यात 12 लाख रुपयांपर्यंतचा नफा (Earn Money Green Chilli Farming) कमावू शकता.

जाणून घ्या कशी करावी शेती?

मिरचीच्या शेतीला तुम्हाला वेळेवर खाद्य टाकणे, सिंचन करणे, खत आणि किटकनाशक, हार्वेस्टिंग, मार्केटिंग सर्व करावे लागेल. यामध्ये तुम्हाला किमान 7 ते 8 किलो मिरचीच्या बियाणाची गरज असेल. हे बियाणे 20-25 हजार रुपयांपर्यंत मिळेल. हायब्रिड बियाणाचा खर्च तर 35-40 हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. हायब्रिड मगधीरा बियाणाची किंमत 40 हजार रुपये आहे. एक हेक्टरमध्ये बियाणापासून अनेक प्रकारचे खर्च करण्यासाठी सुमारे 2.5-3 लाख रुपयांपर्यंत खर्च (Earn Money) येतो.

2 ते 3 लाखात सुरू करा मिरचीची शेती

मिरचीची शेती तुम्ही एक हेक्टरच्या जमीनीवर सुरू करू शकता. मिरचीची शेती बेड बनवून केली पाहिजे.
मिरचीच्या शेतीसाठी चांगल्या प्रतीचे हायब्रीड बियाणे निवडा. मिरचीची रोपे 2-2 फुटाच्या अंतरावर लावा आणि दोन बेडच्या मध्ये सुमारे 2-3 फुटाची जागा ठेवा.

मगधीरा हायब्रिड मिरचीची शेती करत असाल तर ती एक हेक्टरमध्ये सुमारे 250-300 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते.
बाजारात याचा भाव 30 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत असू होऊ शकतो.
उदाहरणार्थ, समजा की तुमची मिरची 50 रुपये प्रति किलो हिशेबाने विकली जात आहे,
अशावेळी 300 क्विंटल मिरची जवळपस 15 लाख रुपयाची होईल, म्हणजे एक हेक्टरमध्ये सुमारे 12 लाख रुपयांचा नफा (Earn Money) होईल.

Web Titel : Earn Money | start chilli farming with rs 2 lakh investment earn12 lakh rupees after 10 month check details here

 

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा