Earn Money | फक्त 10 हजार रुपयात सुरू करा आपला बिझनेस, मंथली होईल 30000 पेक्षा जास्त ‘कमाई’, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Earn Money | जर तुम्ही नोकरदार आहात, परंतु बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा बिझनेस (Business Idea) बाबत सांगणार आहोत जो तुम्ही नोकरीसोबत करू शकता. हा व्यवसाय लोणचे (Pickle Business) तयार करण्याचा आहे. यामध्ये तुम्ही जास्त उत्पन्न मिळवू (Earn Money) शकता.

 

लोणचे निर्मितीचा व्यवसाय घरातून सुरू करू शकता. जेव्हा बिझनेस वाढू लागेल तेव्हा वेगळी जागा घेऊन वाढवण्याचा विचार करू शकता.
हे काम कसे सुरू करू शकता आणि किती कमाई होईल ते सविस्तर जाणून घेवूयात…

 

10 हजारात सुरू करा

 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांची आवश्यकता आहे. यातून 25 ते 30 हजार रुपयांची कमाई होऊ शकते.
ही कमाई प्रॉडक्टची मागणी, पॅकिंग आणि परिसरावर अवलंबून आहे. लोणचे ऑनलाइन, घाऊक, किरकोळ बाजारात आणि रिटेल चेनला विकू शकता.

 

सरकार करेल मदत

 

सरकार यासाठी अनेक योजना चालवत आहे, ज्या उद्योग सुरू करणार्‍यांसाठी आहेत.
अशा सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकता.

 

900 वर्गफुट जागा हवी

 

लोणचे व्यवसायासाठी 900 वर्गफुट जागा आवश्यक आहे.
लोणचे तयार करणे, सुकवणे, पॅक करणे यासाठी मोकळी जागा आवश्यक असते.
यात स्वच्छता आवश्यक असते, तरच लोणचे अनेक दिवस टिकते.

 

किती पैसे कमावू शकता

 

10 हजार रुपये लावून दुप्पट नफा कमावू शकता.
अगोदर मार्केटिंगमध्ये खर्च झालेली रक्कम वसूल होते आणि नंतर केवळ नफा होतो.
हा नफा दर महिन्याला होईल. व्यावसायासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आथोरिटी (FSSAI) चे लायसन्स काढून घ्या.

 

लोणचे मेकिंग बिझनेसचे लायसन्स कसे मिळते

 

लोणचे मेकिंग बिझनेससाठी लायसन्सची आवश्यकता असते.
बिझनेस सुरू करण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीकडून (FSSAI) लायसन्स प्राप्त करता येऊ शकते.
या लायसन्ससाठी ऑनलाइन फॉर्म भरू (Earn Money) शकता.

 

Web Title : Earn Money | start pickle business rs 10k and earn 30k per month check know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | …म्हणून संपुर्ण पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून जमावबंदी अन् कलम 144 लागू

Whatsapp New Features | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय एक जबरदस्त फिचर ! लास्ट सीन केवळ त्यांनाच दिसेल ज्यांना तुम्हाला दाखवायचे आहे

Shilpa Shetty – Raj Kundra | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल