Earn Money | फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त कमाई देतात ‘हे’ ऑपशन्स, जाणून घ्या कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर जवळपास ऑलटाइम लो लेव्हलवर आहेत. तर रेग्युलर इन्कम मिळवण्यासाठी एखाद्या फायनान्शियल इन्स्ट्रूमेंटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही चांगली वेळ नाही. उदाहरणासाठी, भारतीय स्टेट बँक वरिष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षासाठी एफडीवर 5.80 टक्के व्याज देते. एक वर्षासाठी FD वर 5 टक्के व्याज मिळते. सध्या महागाई दर जवळपास 5.59 टक्के आहे. यासाठी, एक वर्षाच्या FD वर, तुम्ही केवळ महागाई दराच्या बरोबरीनेच कमावत (Earn Money) आहात.
व्याजदरात वाढ, ज्याची अनेक तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली होती, अजूनपर्यंत लागू झालेला नाही. जर व्याजदर वाढले तर बँक एफडीमध्ये सुद्धा जास्त रिटर्न मिळेल. परंतु हे पाहता की क्रेडिट घेणे मंदावलेले आहे, बँक अगोदरच रिटेल डिपॉझिट स्टॉकमुळे व्याजदर वाढवण्याची घाईत असू शकत नाही. ही त्या डिपॉझिटर्ससाठी चांगली बातमी नाही जे आपल्या रेग्युलर इन्कमसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर अवलंबून आहेत, कमाईच्या संधी तुमच्या जवळपासच आहेत.
ज्येष्ठ नागरिकांनी SCSS आणि PMVVY मध्ये करावी गुंतवणूक
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) पाच वर्षाच्या कार्यकाळासह येते आणि वार्षिक 7.4 टक्केच्या दराने प्रत्येक तीन महिन्यात पेमेंट करते. या योजनेत योगदान प्राप्तीकर कायद्याचे कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीसाठी पात्र आहे.
परंतु तुम्ही SCSS मध्ये केवळ 15 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्हाला ही मर्यादा नको असेल तर प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा (PMVVY) ऑपशन निवडू शकता. ही योजना भारत सरकारकडून सुरूकरण्यात आली आहे. ज्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केले जाते. ही योजना 7.4 टक्केच्या दराने मासिक व्याज देते. तसेच 15 लाखाच्या वर गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस एमआयएस योजना
वरील दोन योजनांमध्ये एकुण 30 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही दोन इतर पर्याय निवडू शकता जे तुम्हाला योग्य मासिक उत्पन्न देतात. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाऊंट (POMIS) इंडिया पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करते. कमाल गुंतवणूक 4.5 लाख रुपये आहे आणि व्याजदर 6.6 टक्के आहे. ही योजना 60 पेक्षा जास्त वयासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट आणि एनसीडी
प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या हाय इंट्रेस्ट रेटवर एफडी आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. परंतु त्यामध्ये क्रेडिट जोखीमसह येतात.
काही सरकारी मालकीच्या कंपन्या सुद्धा वेळोवेळी थोडी कमी क्रेडिट जोखीमसह एनसीडी सादर करते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एचडीएफसी सुद्धा एफडीवर मासिक व्याज पेमेंट ऑफर करते.
हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. हे डिपॉझिट एकापेक्षा 10 वर्षाच्या कालावधीसाठी केले जाऊ शकते.
कार्यकाळ वाढवल्यास व्याजदर सुद्धा वाढतो. पाच वर्षाच्या एचडीएफसी एफडीवर सध्या 6.2 टक्के व्याज मिळते.
काही हाय रेटेड कंपन्या 9 टक्के व्याजसुद्धा ऑफर करतात.
Web Title : Earn Money | these options earn more than fixed deposits know how and where you can invest
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update