केवळ 5 हजार रुपयांत सुरू करा बिझनेस; दर महिन्याला होईल लाखोंची कमाई…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन करत आहात का…? मग तुम्ही मशरुम फार्मिंगद्वारे मोठी कमाई करू शकता. आज आम्ही सोलनचे विकास यांच्याबाबत सांगणार आहोत, ज्यांनी केवळ 5 हजार रुपये लावून मशरुमची शेती सुरू केली आणि आज ते दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. तुम्हीसुद्धा कशाप्रकारे आपल्या घराच्या खोलीत हा बिझनेस सुरू करून मोठी रक्कम मिळवू शकता ते जाणून घेऊयात…

रोज उगवत आहेत 3 टन मशरुम
सोलनच्या विकास यांनी सांगितले की, त्यांनी स्मॉल स्केलवर हा बिझनेस सुरू केला आणि नुकतेच नवीन बिझनेस फार्म सुरू केले आहे. ते म्हणतात, येथे आम्ही रोज 3 टन मशरुम उगवत आहोत. या बिझनेससाठी कोणतेही खास ट्रेनिंग घेण्याची गरज नाही.

5 हजार रुपयांत सुरू केला होता बिझनेस
विकास यांनी 1990 मध्ये मशरुम फार्मिंगचा बिझनेस सुरू केला होता. त्यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटसह बिझनेस सुरू केला होता आणि आता 2020 मध्ये ते दर महिना लाखो रुपये कमावत आहेत.

खोलीत सुरू करू शकता बिझनेस
हा बिझनेस तुम्ही एका खोलीत सुरू करू शकता. यासाठी काही क्लायमेट कंडिशनला मेंन्टेन करावे लागते. जसे की – टेम्परेचर, ह्यूमिडिटी आणि कार्बन डायऑक्साइड आवश्य मॅनेज करावा लागतो.

20 ते 25 दिवसांत उगवू शकतात मशरुम
तुम्हाला मार्केटमध्ये हे कम्पोजट सहज मिळते. याशिवाय तुम्ही पॅकेटवाले म्हणजे अगोदरच तयार कम्पोजटसुद्धा खरेदी करू शकता. या पॅकेटला तुम्हाला सावलीत किंवा खोलीत ठेवावे लागते. यानंतर 20 ते 25 दिवसांच्या आत यामध्ये मशरुम उगवू लागतात.

कम्पोस्ट बनवण्याची कृती
कम्पोस्ट बनवण्यासाठी भाताचा पेंढा भिजवावा लागतो आणि एक दिवसानंतर यामध्ये डीएपी, युरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्यूडोरन मिसळून, हे कुजण्यासाठी ठेवून दिले जाते. सुमारे दीड महिन्यानंतर कम्पोस्ट तयार होते. आता शेणखत आणि माती समप्रमाणात मिसळून सुमारे दीड इंचाचा थर पसरवून, त्यावर कम्पोस्टचा दोन-तीन इंचाचा मोठा थर चढवला हातो. यामध्ये ओलावा कायम ठेवण्यासाठी स्प्रेने मशरुमवर दिवसात दोन ते तीन वेळा पाणी शिंपडले जाते. यावर एक-दोन इंचाचा कम्पोस्टचा आणखी थर चढवला जातो. आणि अशाप्रकारे मशरुमची निर्मिती सुरू होते.

मशरुमच्या शेतीचे घ्या ट्रेनिंग
सर्व अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटज आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरुमच्या शेतीलचे ट्रेनिंग दिले जाते. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात शेती करण्याची योजना आखत असाल, तर असे ट्रेनिंग जरूर घ्या. प्रति वर्ग मीटरमध्ये 10 किलोग्रॅम मशरुम सहज उगवतात. कमीत कमी 40 बाय 30 फुटांच्या जागेत तीन-तीन फूट उंच रॅक बनवून मशरुम उगवता येऊ शकतात.