Earn Money | केवळ 5 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ बिझनेस; दरमहिना 30 हजार रुपयांची होईल कमाई, मोदी सरकार देईल सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुम्ही सुद्धा नोकरीशिवाय जादा उत्पन्न (Extra income) मिळवण्याचा विचार करत असाल किंवा एखादा नवीन व्यवसाय (business opportunity) सुरू करण्याबाबत विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया देणार (business idea) आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहिना बंपर कमाई (earn money) करू शकता.

 

भारतात मोठ्या लोकसंख्येला चहा (Kulhad making business) ची आवड आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळावर सुद्धा कुल्हड चहाला मागणी असते. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवणे आणि विकण्याचा बिझनेस सुरू करू शकता. हा बिझनेस (Earn Money) कसा सुरू करावा ते जाणून घेवूयात…

 

इलेक्ट्रिक चाक उपलब्ध करून देते सरकार

मोदी सरकारने कुल्हड बिझनेस वाढवण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या अंतर्गत कुंभारांना वीजेवर चालणारे चाक दिले जाते. नंतर तयार कुल्हड खरेदी सुद्धा केले जातात.

 

कमी खर्चात सुरू करता येतो बिझनेस

हा बिझनेस अतिशय कमी खर्चात सुरू होऊ शकतो. यासाठी थोडी जागा आणि 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे चेयरमन विनय कुमार सक्सेना यांनी माहिती दिली की, यावर्षी सरकारने 25 हजार इलेक्ट्रिक चाकांचे वितरण केले. (Earn Money)

 

किती रुपयात विकू शकता कुल्हड

चहाच्या कुल्हडचा भाव सुमारे 50 रुपये शेकडा आहे.
अशाच प्रकारच्या लस्सी कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आणि प्याली 100 रुपये शेकडा आहे.
मागणी वाढल्यास यापेक्षा चांगला भाव मिळू शकतो.

 

दरदिवशी किती होईल बचत

सध्या शहरांमध्ये कुल्हड चहाची किंमत 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा असते.
जर बिझनेस योग्यप्रकारे चालवला आणि कुल्हड विकण्याकडे लक्ष दिले तर 1 दिवसात 1,000 रुपयांची बचत केली जाऊ शकते.

 

Web Title :- Earn Money | you can start kulhad making business in 5k rupees and earn 30k per month check how modi government will help you also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा