नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जास्त जोखीम न स्वीकारता चांगले रिटर्न मिळवण्यासाठी अनेकदा पोस्ट ऑफिस योजना प्रसिद्ध होतात. या योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्याला खात्रीशीररित्या जास्त नफा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत त्यापैकी सर्व योजनांची माहिती घेऊन तुम्ही योग्य योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये करू शकता गुंतवणूक
पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेमध्ये तुम्ही बचत करू शकता त्यामध्ये पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंट, नॅशनल सेविग्ज रिकरिंग डिपॉजिट अकाउंट, नॅशनल सेविंग्स टाइम डिपॉजिट अकाउंट, नॅशनल सेविंग्स मंथली इकनम अकाउंट, सीनियर सीटिजन सेविंग्स स्कीम अकाउंट, पब्लिक प्रोविडेंट फंड, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट अकाउंट, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धि योजना या सर्व योजनांमध्ये तुम्ही सहजतेने गुंतवणूक करू शकता.
या योजनेत गुंतवणूक करू शकता मोठी बचत
या योजनेमध्ये सरकारची गॅरंटी असल्यामुळे तुम्ही मोठ्या कालावधीसाठी चांगली रक्कम गुंतवू शकता. मोठ्या कालावधीसाठी जर तुम्ही एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पीएफ योजना आणि नॅशनल सेविग्ज सर्टिफिकेट योजना ही उत्तम पर्याय ठरू शकतात. जाणून घेऊयात कसे.
कशी करू शकता एक कोटींची बचत
पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोविडेंट फंड यामध्ये तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. याचा कालावधी पंधरा वर्षांसाठी आहे. ज्याची मर्यादा तुम्ही पाच पाच वर्षांसाठी देखील वाढवू शकता. जर यावर व्याजदर सारखा राहिला तर 300 रुपये प्रति दिन बचत कराल तर 268 महिन्यनमध्ये 1 कोटी रुपयांची बचत करू शकता.
300 रुपये प्रती दिन जमा करून होईल 1 कोटी रुपये
प्रत्येकी दिवशी 300 रुपये प्रती दिनी जमा करून एका वर्षात एकूण 1,09,500 रुपये बचत करू शकता. या योजनेनुसार तुम्ही वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवू शकता. 7.9 % ने व्याजदर यासाठी मिळणार आहे. यानुसार 26.8 वर्षात एक कोटी रुपयांची बचत तुम्ही करू शकता. परंतु ही गोष्ट महत्वाचे आहे की 26 वर्ष पूर्ण पैसे भरल्यानंतर 30 वर्षानंतरच तुम्ही याची संपूर्ण रक्कम मिळवू शकता.
प्रत्येक दिवशी 400 रुपये याप्रमाणे अशी होणार 1 कोटींची बचत
जर तुम्ही प्रत्येक दिवशी 400 रुपयांची बचत करता ते एका वर्षाला 1,45,000 रुपये गुंतवणूक करू शकता. 7.9 % व्याजाने 23 वर्ष 5 महिन्यात एक कोटी रुपये जमवू शकता आणि या खात्याचा लाभ तुम्ही 25 वर्षानंतरच मिळवू शकता. जितक्या लवकर गुंतवणूक सुरु करणार तितक्या लवकर तुम्हाला याचा लाभ मिळायला सुरुवात होईल. याबाबतची अधिक माहिती तुमि पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेब साईट वरून मिळवू शकता.
Visit : Policenama.com
- विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे
- ‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या
- हृदयविकार आणि ‘कार्डिअॅक अॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे
- महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे
- ‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या
- रोज अंडे खाण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, जाणून घ्या
- महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे