Earth Day 2020 : ‘हे’ 5 कलाकार पर्यावरणाला उत्तम करण्यासाठी ‘प्रयत्नशील’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अनेक सेलेब्स असे आहेत जे कायमच पर्यावरणाला उत्तम स्थान देण्याबद्दल बोलत असतात. काही कलाकार यासाठी कामही करत आहेत. अशाच 5 सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) प्रज्ञा कपूर- फिल्म निर्माता प्रज्ञा कपूर पर्यावरणाबद्द खूपच जागरूक आहे. ती खरंच एक पर्यावरणवादी आहे. इकोसिस्टीम उत्तम करण्याच्या अनेक अॅक्टविटीजमध्ये ती सहभागी होत असते. यावर्षीच तिनं द अर्थ फाऊंडेशनची सुरुवात केली आहे. ही फाऊंडेशन जलवायू संकटाबद्दल जागरुकता निर्माण करणं, वृक्षारोपन, पशू कल्याण, समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता यावर काम करते.

2) अक्षय कुमार- अक्षयनं ग्रामीण भागात योग्य स्वच्छता सुविधांचा प्रचार केला आहे. भारत सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानातही तो ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्यानं अनेकदा वायु प्रदुषणावर भाष्य केलं आहे. यावर एक गाणंही होतं ज्यात त्यानं काम केलं आहे.

3) दिया मिर्झा- दिया भारताची संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना दूत आहे. ती दीर्घकाळापासून पर्यावरणाची समर्थक राहिली आहे. तिनं स्थायी विकास, वन्यजीव संरक्षण, स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्र, जयवायू परिवर्तन, वायु प्रदुषण अशा अनेक मुद्द्यावर काम केलं आहे.

4) जॉन अब्राहम- जॉन प्रामुख्यानं पशु कल्याणाच्या दिशेनं काम करतो. याआधी त्यानं पेटासोबत(PETA) एका अभियानावर काम केलं आहे. जनावरांसोबत केल्या जाणाऱ्या गैरवर्तनावर आधारीत हे अभियान होतं. याशिवाय एका गावाला सौरऊर्जा देण्याच्या प्रोजेक्टशीदेखील तो जोडला गेला आहे.

5) अभिषेक बच्चन- अभिषेकला पर्यवारणासाठी केलेल्या कामाबद्दल जॉनला 2012 मध्ये ग्रीन ग्लोब पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानं ग्लोबल वॉर्मिंगवरही अनेकदा भाष्य केलं आहे. त्यानं पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.