नवे टेन्शन ! आपल्या आसा भोवती आता वेगाने फिरू लागली पृथ्वी, शास्त्रज्ञ झाले हैराण, जाणून घ्या काय आहे प्रकरण

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनी पृथ्वीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. यानुसार, मागील 50 वर्षांपेक्षा जास्तीच्या तुलनेत पृथ्वी (Earth) आता आपल्या आसा भोवती वेगाने फिरू लागली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मागील 5 दशकांमध्ये आलेल्या या स्पीडमधील बदलामुळे पृथ्वीवर (Earth) प्रत्येक दिवस 24 तासापेक्षा कमी होऊ लागला आहे.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, 2020 पासून प्रत्येक दिवशी पृथ्वी (Earth) आपल्या आसावर 24 तासांपेक्षा सुद्धा कमी वेळात फेरी मारत आहे. इतकेच नव्हे, 1960 च्या नंतर शास्त्रज्ञांद्वारे पृथ्वीच्या (Earth) गतीबाबत जमा करण्यात येत असलेल्या आकड्यांनंतर 19 जुलै 2020 सर्वात छोटा दिवस ठरला आहे.

19 जुलै ठरला सर्वात छोटा दिवस
पॅरिस येथील इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिसच्या (Earth rotation service)
शास्त्रज्ञांनी जमा केलेल्या आकड्यांनुसार, 19 जुलै 2020 चा दिवस 24 तासापेक्षा 1.46 मिली सेकंद कमी होता. यापूर्वी सर्वात छोटा दिवस 2005 मध्ये होता, परंतु, मागील 12 महिन्यांमध्ये हा रेकॉर्ड एकुण 28 वेळा मोडला आहे.

शास्त्रज्ञ दावा करत आहेत की, एका सरासरीच्या तुलनेत पाहिले तर आता एक दिवस मान्य 24 तासापेक्षा 0.5 सेकंद कमी झाला आहे. अशात अनेक शास्त्रज्ञ तर या गोष्टीवर सुद्धा विचार करत आहे की, आता वेळेतून एक सेकंद कमी केला पाहिजे का.

या प्रक्रियेला ’निगेटिव्ह लीप सेकंद’ (Negative leap second) म्हटले जाते. असे समोर येणारे बदल पृथ्वीच्या गतीसह टाइमचे कनेक्शन कायम राखण्यासाठी केले जाऊ शकतात.

पृथ्वी वेगाने फिरल्याने कोणती समस्या होणार
पृथ्वीच्या (Earth) गतीसह आपले वेळेचे मानक सुद्धा ठरलेले आहेत. जर पृथ्वीच्या (Earth) गतीमध्ये मोठे बदल झाले तर वेळेच्या गणनेला सुद्धा बदलावे लागेल.

सोबतच आपल्या दूरसंचार व्यवस्थेत सुद्धा अडचणी येऊ शकतात. असे यासाठी की, सॅटेलाइट्स आणि दूरसंचार यंत्र सोलर टाइमनुसारच सेट केली जातात. ही वेळ तारे, चंद्र आणि सूर्याच्या स्थितीनुसार ठरवली जाते.

1970 पासून आतापर्यंत 27 लीप सेकंद जोडले गेले आहेत. असे पृथ्वीच्या (Earth) गतीत सतत येणार्‍या बदलांमुळे करावे लागले आहे. शेवटच्यावेळी 31 डिसेंबर 2016 ला लीप सेकंद जोडला गेला होता. आता मात्र लीप सेकंद हटवण्याची वेळ आली आहे म्हणजे निगेटिव्ह लीप सेकंद जोडावा लागेल.