Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला

नवी दिल्ली : गेल्या काही तासात देशाच्या वेगवेगळ्या भागात 5 ठिकाणी भुकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत़ भुकंपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्याने बिकानेर (Bikaner) आणि मेघालय (Meghalaya) हादरला आहे. मात्र, या भुकंपामुळे आतापर्यंत तरी कोणत्याही जीवित अथवा मालमत्तेच्या हानीचे वृत्त समोर आले नाही.

राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेरमध्ये पहाटे ५ वाजून २४ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ एवढी मोजली गेली आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानात असून २९.१९ आणि ७०.०५ अक्षांश आणि रेखांक्षवर ११० किमी खोल असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Centre for Seismology Meghalaya) म्हटले आहे. या भुकंपाचे केंद्रबिंदू बिकानेरपासून ३४३ किमी आणि जोधपूरपासून ४३९ किमी दूर आहे. या भूकंपाचा धक्का पाकिस्तानातील पंजाब प्रांतासह राजस्थानात जाणवला आहे.

या भूकंपाच्या अगोदर मेघालयातील वेस्ट गारो हिल्स भागात पहाटे २.१० मिनिटांनी भुकंपाचा झटका जाणवला. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ एवढी मोजली गेली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू शिलॉगपासून १५९ किमी आणि बांगला देशातील ढाकापासून २३० किमी दूर आहे.

त्याच वेळी लेह लडाख येथे पहाटे ४.५७ वाजता भूकंपाचा झटका जाणवला. त्यांची तीव्रता रिश्टर
स्केलवर ३.६ इतकी होती तर, त्याची खोली २०० किमी खोल इतकी होती. लेह शहरापासून १९
किमीवर त्याचा केंद्रबिंदू होता. हरियाना येथील सोनपत येथे पहाटे १.०८ आणि पहाटे २.०६ वाजता
असे लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता २.३ आणि २.१ इतकी
नोंदविली गेली होती.

हे देखील वाचा

Pune Crime | चाकण एमआयडीसीमधील ATM चा भीषण स्फोट; पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

Osmanabad Cyber Police | ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला बिहारमधून अटक; उस्मानाबाद सायबर सेलची मोठी कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Earthquake | An earthquake of magnitude 5.3 on the Richter scale hit Bikaner, Rajasthan at 5:24 am today: National Centre for Seismology Meghalaya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update