‘दिल्‍ली-एनसीआर’सह संपुर्ण उत्‍तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दिल्ली एनसीआरसरह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सदर भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक लोक घर आणि कार्यालये सोडून बाहेर पडले आहेत. आपापल्या परीने जीव वाचवण्याचे सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानातील रावळपिंडी या ठिकाणी असून आज दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत असे समजत आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे समजत आहे. या भूकंपाची तीव्रता जास्त होती. हा भूकंप 6.1 रिश्टर स्केल इतका होता.

हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशातील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत अशी माहिती आहे. या भूकंपात जीवितहानी झालेली नसली तरी, तीव्रता जास्त असल्याने किती घरांचे नुकसान झाले आहे याची माहिती प्रशासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

Visit : policenama.com