दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, रिश्टर स्केलवर 4.7 मोजली गेली तीव्रता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे धक्के शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ मोजली गेली. तर भूकंपाचे केंद्र राजस्थानच्या अलवर येथे होते.

गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. यापूर्वी गुरुवारी लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचे केंद्र कारगिलपासून ११९ किलोमीटर नॉर्थवेस्टमध्ये आहे.

लडाखमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी २ वाजून २ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.६ मोजली गेली आहे.