हिंगोली, नांदेड, यवतमाळमध्ये भुकंपाचे धक्के

यवतमाळ (Yavatmal) : विदर्भासह, मराठवाड्यातील काही भागाला आज सकाळी भुकंपाचा (Earthquake) धक्का बसला. रविवारी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी भुकंपाचा (Earthquake) हा धक्का बसला असून रेस्टर स्केलवर त्याची नोंद ४.४ इतकी झाली आहे.

या भुकंपाचा केंद्रबिंदू १९.७३ रेखांश आणि ७७.७७ अक्षांशावर असून त्याची खोली १० किमी इतकी होती. या भुकंपाचे केंद्रबिंदू यवतमाळजवळ असून नागपूरपासून तो २०८़ किमी दूर होता. या भुकंपाचे हदरे विदर्भ, मराठवाड्यातील मोठ्या परिसराला बसले. त्यामुळे लोक घाबरुन घराबाहेर आले. यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने झोडपले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच आज सकाळी भुकंपाचा धक्का जाणवला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये भुकंपाचा धक्के जाणवले. सांडस
परिसरात जमिनीतून दोनदा आवाज आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नांदेड शहरातील काही भागातही
या भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर मागील
३ वर्षांपासून भुगर्भात आवाज येऊन हे भुकंपाचे धक्के जाणवत आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातही आज सकाळी भुकंपाचा धक्का जाणवला. परिसरातील किमान १५ गावांमधील लोकांना हे धक्के जाणवले. गावातील घरावरील पत्रे हलल्याचे नागरिकांना जाणवले. या भुकंपामध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

हे देखील वाचा

Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 210 रुग्णांना डिस्चार्ज

Pune Crime News | ‘लफडेबाज’ पत्नी ‘अंजली’चा पती ‘नितीन’ने केला भररस्त्यात गळा चिरून खून; हडपसर परिसरातील बंटर स्कूलच्या पाठीमागे घडलेली घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Earthquake in Hingoli, Nanded, Yavatmal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update