‘कोरोना’च्या संकटादरम्यानच सातारा जिल्हयात भूकंपाचा धक्का

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोयना परिसरातील पाटण, कोकण कोनारपट्टीचा परिसरात रात्री दीडच्या च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कोयना परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल एवढी होती. तर भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील चांदोली गावाच्या पश्चिमेला ६ किमी अंतरावर असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोयना धरण परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. २४ जून रोजी वारणा खोऱ्यात २.३ रिश्टर स्केल भूकंप जाणवल्याची नोंद झाली होती. दरम्यान, वारणा खोऱ्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच नागिरकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे.

दिल्लीत दोन दिवसांपूर्वी जाणवले होते धक्के
दोन दिवसांपूर्वी दिल्ली आणि परिसरात संध्याकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य असा काही सेकंद धक्का जाणवला होता. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसत आहे. National Centre for Seismology सांगिल्यानुसार, गुरगावपासून नैर्ऋत्येला ६३ किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ एवढी नोंदवली आहे.