Earthquake In Marathwada | हिंगोली, परभणी व नांदेडमध्ये भूकंप, रिश्टर स्केलवर 4.5 ची नोंद

पोलीसनामा ऑनलाईन – Earthquake In Marathwada | आज सकाळी ६.०८ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद ४.५ झाली आहे. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान होते. भूकंपाची खोली १० किलोमीटरच्या परिसरात होती. मात्र, भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.(Earthquake In Marathwada)

दरम्यान, भूकंप झालेल्या भागातील काही जुन्या घरांना तडे गेले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच घाबरलेले लोक घराबाहेर पळत सुटले. विशेष म्हणजे या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा ३.६ रिश्टर स्केलचा दुसरा धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी नंतरचा हा अलिकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठे नुकसान झाले असेल तर त्याची माहिती एकत्रित केली जात आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागात भूकंपाची तीव्रता जास्त होती. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमिनीतून आवाज येऊन हादरे बसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare Meet Anantrao Thopate | शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट, शरद पवारांची थोपटेंनी सांगितली ‘ही’ कटू आठवण, कोणाचा करणार प्रचार?