‘कोरोना’विरूध्द ‘झुंज’ देणार्‍या चीनमध्ये भूकंपाचे ‘झटके’, संपुर्ण देशभरात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन मध्ये कोरोनाचे साथीच्या रोगांमध्ये रूपांतर झाले आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे जवळपास ३६१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची नोंद समोर आली आहे. जगभरातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना चीनमध्ये जाण्यास मनाई केली आहे, तर काही देशांनी चीनकडे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनासंदर्भात आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणीची घोषणा केली आहे. या दरम्यानच आता चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

कोरोना विषाणूला तोंड देणार्‍या दक्षिण पश्चिम चीनमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यानंतर चिनी प्रशासनाने तातडीने कारवाईस सुरुवात केली आहे आणि बचावकार्य देखील सुरु केले आहे. एका वृत्तसंस्थेने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे ३०.७४ अंश उत्तर अक्षांश आणि १०४.४६ अंश पूर्व रेखांश जमिनीच्या आत २१ किलोमीटर इतका होता तर रेक्टल स्केलवर त्याची तीव्रता ५.१ एवढी मोजली गेली.

मदतकार्य सुरु, आतापर्यंत १५० लोकांना वाचवण्यात यश
चीनमधील भूकंपाच्या धक्क्याने नुकसान पोचलेल्या जवळपास १५० लोकांना वाचवण्यात आले आहे, तर ३४ वाहनांना भूकंपग्रस्त क्षेत्रात मदतकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. चीनच्या एका सरकारी समाचार एजेन्सीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवित हानी किंवा कुणाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जिंतांग काऊंटी चे एक स्थानिक रहिवासी जांग हुन यांनी सांगितले की जवळपास १० सेकंद जमीन हालत होती. भूकंप केंद्राच्या ३८ किलोमीटर दूर असणाऱ्या चेंगडू इलाक्यात जोराचे धक्के जाणवले आहेत.

सांगितले जात आहे की भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक आपल्या घरातून बाहेर निघाले आणि रस्त्यावर, खुल्या मैदानात जीव वाचवण्यासाठी धाव घेऊ लागले. भूकंपाच्या जोराच्या हादऱ्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिंतांग इलाक्याच्या एका व्यक्तीने सांगितले की त्यांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि त्यानंतर त्यांनी सर्वात आधी आपल्या मुलास उचलले आणि घराच्या बाहेर पळाले. तर काही लोक घराबाहेर पळून आपल्या कारमध्ये बसून पळू लागले.