भुकंपाच्या धक्क्याने अंदमान निकोबार हादरलं

पोर्ट ब्लेअर : पोलीसनामा ऑनलाईन – अंदमान निकोबार बेट भूकंपाने हादरलं आहे. पाऊने पाचच्या दरम्यान अंदमानच्या बेटांवर 5.1 रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे जाणवले असल्याचे वृत्त एएनआयकडून देण्यात आले आहे. सुरक्षा रक्षक परिसरात मदतीसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, यात कोणतीही हानी झाली असल्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.