मिझोरम भूकंपामुळे हादरले, रिश्टर स्केलवर 5.0 तीव्रता

आयझॉल : वृत्तसंस्था – मिझोरममध्ये भुकंपाचे धक्के बसल्याने हादरून गेले आहे. गुरुवारी (दि.18) सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.0 इतकी होती. या भुकंपाचे केंद्र मिझोरममधील चंपाईपासून 98 किमी दक्षिणपूर्व येथे होते.

यावेळी भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मागील अनेक दिवसांपासून देशातील विविध भागामध्ये दररोज भुकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत. मागील दोन महिन्यांत राजधानी दिल्ली, मुंबई, जम्मू-काश्मीर आणि गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के 12 वेळा जाणवले आहेत.

दरम्यान गुजरातमध्ये 5.5 तीव्रतेचा पहिला भूकंप वगळता हे सर्व भूकंप सौम्य तीव्रतेचे होते. बुधवारी मुंबईत रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के जाणवले होते. या भुकंपाचे केंद्रबिंदू मुंबईपासून 103 किमी उत्तरेस होते.