पालघरमध्ये सौम्य भूकंपाचा धक्का, 3.1 रिश्टर स्केलची नोंद !

पोलीसनामा ऑनलाइन – पालघरमध्ये काल मध्यरात्री भूकंपाच सौम्या धक्का बसला. भूकंपाची क्षमता 3.1 एवढ्या तीव्रतेची रिश्टर स्केलवर नोंद झाली. दहा किलोमीटर खोल भूगर्भात हा धक्का बसला असल्याची माहिती आहे. या अगोदरही डिसेंबर महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात 14 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. हा धक्का 4.8 रिश्टर स्केलचा असल्याची माहिती समोर आली होती. या भूकंपामुळे डहाणू तालुक्यातील काही घरांच्या भिंतीला भेगा गेल्याची प्राथमिक माहिती होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. काल रात्री पालघरमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.