काय सांगता ! होय, ‘या’ देशाच्या पंतप्रधानांची Live मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचा धक्का (व्हिडीओ)

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – एखादी मुलाखत सुरु असताना अचानक मध्येच लहान मुलगा तसेच कधी मांजर तर कधी कुत्रा आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरती सतत व्हायरल होत असतात. आणि आपण त्याकडे मनोरंजनात्मक दृष्ट्या बघतो व दुर्लक्ष देखील करतो. पण आपण कधी असे पाहिलं आहे का, जर एखादी मुलाखत सुरु आहे आणि मध्येच भूकंप आला तर काय होईल? आणि जर ती मुलाखत एखाद्या पंतप्रधानाची असेल तेव्हा काय होईल? परंतु, हे आज प्रत्यक्षात घडलं आहे. हा आगळावेगळा प्रकार आज न्यूझीलंड मध्ये घडला आहे. न्यूझीलंड चे पंतप्रधान जेसिंडा अरर्डेन यांच्या मुलाखतीदरम्यान अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. पण त्यांनी घाबरून न जाता परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यूझीलंड मधील कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनची बंधन उठवण्याच काम सुरु आहे. त्या संदर्भांतील माहिती त्या एका वृत्तवाहिनीला सांगत होत्या. ही मुलाखत सुरु असतानाच अचानक कॅमेरा हालायला लागला. तसेच जेसिंडा यांच्या मागे असणाऱ्या काही वस्तू आणि भिंतीवरचे बोर्डही देखील हालायला लागले. नेमकं काय झालं हे लगेच सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या अँकरने पंतप्रधान यांना मुलाखत थांबवायची आहे का? असा प्रश्न विचारला.

त्यावरती पंतप्रधान जेसिंडा यांनी नकार दिला. मी सुरक्षित असून, मी मोकळ्या जागेत आहे. माझ्यावरती कुठलेही लाईट्स वैगेरे काही नसल्यामुळे मी सुरक्षित असल्याचं त्यांनी हसत सांगितलं व मुलाखत पूर्ण केली. मात्र, नंतर माहिती मिळाली की भूकंपाचा धक्का हा ५.८ रिश्टर स्केलचा होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. न्यूझीलंड मध्ये दरवर्षी तब्बल २०,००० धक्के जाणवतात. दररोज सरासरी ५० ते ८० सौम्य आणि हलक्या स्वरूपाचे धक्के तेथे जाणवत असतात. तेथील सर्व नागरिकांना याची सवय झाली आहे. हे धक्के जेव्हा मोठे असतात तेव्हाच ते जाणवतात.