पालघर पुन्हा हादरले ; आजपर्यंतचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का

पालघर  : पोलीसनामा ऑनलाईन – पालघर आज पुन्हा भूकंपाने हादरले आहे. आज सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास पालघर तालुक्यामध्ये सुमारे ४. ३ रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे. काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. पाालघर जिल्ह्यासह गुजरातमधील उंबरगाव, सिल्वासा, वापीही या भूकंपाने हादरले आहे. आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता किनारपट्टीवरील सातपाटी ते जव्हारपर्यंत पसरली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहे. महिन्याभरापूर्वी पालघरमध्ये एका दिवसात ६ भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्ये  एका चिमुकलीचा जीव गेला होता. मागील महिन्यात ४. १ चा धक्का बसला होता. पालघरमध्ये  वाढत्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या –

१० हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात 

नारायण राणेंच्या पक्षाला मिळाले ‘हे’ अनोखे निवडणूक चिन्ह 

पुण्यात मंडई गणपती परिसरात भीषण आग 

एटीएमला चकवा देऊन पैसे लुबाडणाऱ्या राजस्थानातील दोघांना पुण्यात अटक 

‘आम्ही नोकरी करतो , राजकारण नाही… असे मंत्र्यांना ठणकवणाऱ्या ‘त्या’ DYSP ला गृहमंत्री पदक