नागपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.3 होती तीव्रता

नागपूर :पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात नागपुरच्या उत्तर पूर्वमध्ये आज पहाटे भूकंपा(earthquake) चे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने सांगितले की, रिश्टर स्केलवर भूकंपा(earthquake )ची तीव्रता 3.3 होती. हा भूकंप सकाळी 4:10 वाजतानागपुरच्या उत्तर-उत्तरपूर्वमध्ये 96 कि.मी. दूर नोंदला गेला. सध्यातरी भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

यापूर्वी सिक्किममध्ये गंगटोकजवळ रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 होती. सिक्किममध्ये गंगटोकमध्ये भूकंपाचे धक्के दुपारी 12 वाजून 6 मिनिटाने जाणवले होते.