Earwax Cleaning Tricks | कानातील मळ काढण्याची ‘ही’ पद्धत अतिशय धोकादायक, सावध व्हा ! अन्यथा फाटू शकतो कानाचा पडदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Earwax Cleaning Tricks | कानात मळ जमा होणे सामान्य बाब आहे, आणि याचा अर्थ हा नाही की तुम्ही घाणेरडे (Earwax Cleaning Tricks) आहात. हा मळ कानाच्या बाहेरील भाग आणि इयर कॅनलच्या पेशींमधून निघालेले नॅचरल ऑईलने बनतो (right method of removing earwax). मळ, घाम आणि डेड स्किन सेल्ससोबत मिळून हे ऑईल मळ बनते. इयर व्हॅक्स म्हणजे मळ प्रत्यक्षात एक सुरक्षा कवच प्रमाणे आहे (Ear wax is actually a protective shield).

 

बडचा वापर धोकादायक
हा मळ हानिकारक बॅक्टेरियांना कानात प्रवेश करण्यापासून रोखतो. सामान्यपणे लोक कानाच्या स्वच्छतेसाठी इयर बडचा वापर करतात, जो चुकीचा आहे. अमेरिकेतील एका तज्ज्ञाने सांगितले की, कान स्वच्छ करण्याची ही पद्धत धोकादायक आहे.

 

मळ आपोआप होईल कमी
अमेरिकेच्या लुईसविले युनिव्हर्सिटीमध्ये कान, नाक आणि घसातजज्ञ, जेरी लिन (Jerry Lynn, an ear, nose and throat specialist at Louisville University in the United States) यांनी ’द सन’ (The Sun)ला सांगितले की, कानाचा मळ आपोआपच कमी होतो. आणि यासाठी तुम्ही जास्त अस्वस्थ होण्याची गरज नाही.

 

खुपच जास्त मळ असेल तर डॉक्टरांकडे जा
मात्र, जर तुमच्या कानात खुप जास्त मळ जमा झाला असेल, त्यामुळे कानात वेदना होत असतील तर त्याची स्वच्छता आवश्यक आहे. कधी-कधी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडू शकते. परंतु बहुतांश प्रकरणात तुम्ही घरीच कान स्वच्छ करू शकता.

 

तर इयर कॅनलचे होते नुकसान
डॉक्टर जेरी यांचे म्हणणे आहे की, इयर बडद्वारे कानाच्या वरवरचे थोडे व्हॅक्स काढता येऊ शकते, परंतु बड कानाच्या आत कधीही टाकू नका. हे धोकादायक ठरू शकते आणि इयर कॅनलचे नुकसान होऊ शकते.

इयर कॅडलिंगचा सर्वात भयंकर
इतकेच नव्हे, यामुळे कानाचा पडदा सुद्धा फाटू शकतो. याशिवाय चुकूनही इयर कॅडलिंगचा प्रयत्न करू नये, ज्यामध्ये लोक गरम मेण टाकून कानाची स्वच्छता करतात. कान स्वच्छ करण्याची ही पद्धत सर्वात भयंकर आहे. (Earwax Cleaning Tricks)

 

कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत (The right way to clean the ears) –
डॉक्टर जेरी यांचे म्हणणे आहे की, कानाचा मळ स्वच्छ करण्याची सर्वात सुरक्षित पद्धत इयर ड्रॉप आहे.
हे लिक्विड सोल्यूशन असते आणि जे कानातील मळ पातळ आणि मऊ बनवते. यामुळे मळ सहज कानाच्या बाहेर येतो.
हे लिक्विड सर्व मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते. हे खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

 

पाच दिवसांपर्यंत टाका इयर ड्रॉप (Add ear drops for five days)
सामान्यपणे इयर ड्रॉप ताबडतोब काम करतात परंतु जर मळ खुप जास्त आणि कडक असेल तर
याचा वापर अनेकदा करावा लागू शकतो. 2018 च्या एका संशोधनानुसार,
पाच दिवसांपर्यंत इयर ड्रॉप टाकल्याने कानातील मळ पूर्णपणे स्वच्छ होतो आणि याशिवाय कोणत्याही वस्तूचा वापर कानात करू नये.

 

Web Title :- Earwax Cleaning Tricks | earwax cleaning tricks earbuds safe ways to remove health tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News | आईवर प्रेम आणि मुलीसोबत अश्लिल चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकींनी दिली शिक्षा

Rakesh Jhunjhunwala | बाजारात प्रचंड घसरण, पण राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोचा शेयर 13% वधारला

Nia Sharma | अबब..! चक्क टेबलवर उभं राहून नाचली ‘ही’ अभिनेत्री, पाहा व्हायरल Video