Aadhaar Card बँक खात्याशी लिंक करण्याचा सर्वात सोपा उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या बँकांना केवायसी (KYC) म्हणून आधार कार्डची ( Aadhar Card) सक्ती करण्यात आली आहे. अन्यथा तमचं खातच गोठवलं जात आहे. त्यामुळं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आपण काही पर्याय जाणून घेणार आहोत.

नेट बँकिंगच्या (Net Banking) माध्यमातून

यासाठी तुम्हाला नेट बँकिंग लॉगइन करावं लागणार आहे. यानंतर तुम्हाला आधार नंबर एन्टर करावा लागणार आहे. तिथं तुम्हाला योग्य त्या सूचना दिल्या जातात. यानंतर व्हेरिफाय झाल्यानंतर तुमची आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल.

एटीएमद्वारे (ATM)

ही सुविधा फक्त डेबिट कार्डवरच उपलब्ध आहे. हे डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्याचं असायला हवं.

बँक शाखेत जाऊन

बँक शाखेत जाऊनही तुम्ही बँक खात्याशी आधार लिंक करू शकता. तिथं तुम्हाला एक अर्ज भरावा लागतो. यात नाव, वय आणि जन्म तारीख, रजिस्टर मोबा. नंबर आणि बँक अकाऊंट नंबर आणि आधार नंबरची माहिती द्यावी लागेल. बँक तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करून तुमचं आधार खात्याशी लिंक करतं.

मोबाईल अ‍ॅप (Mobile App)

बँकेच्या मोबाईल अ‍ॅपवरूनही तुम्ही बँक अकाऊंट लिंक करू शकता.

आधार लिंक झालं की नाही कसं पहाल ?

– युआयडीएआयच्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in/) जा

– यानंतर Check Aadhar/Bank Linking Status या पर्यायावर क्लिक करा.

– आता स्क्रीन वर एक पेज ओपन होईल. यावर 12 अंकी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

– आता तुम्हाला सेंड ओटीपी (Send OTP) वर क्लिक करावं लागेल. हा ओटीपी 10 मिनिटांसाठी वैध असेल.

– आता मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर लिंकिंग स्टेटस दिसतं.