पूर्व हवेली : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, फुरुसंगी, थेऊर, कुंजीरवाडीत भाजीपाला विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

पुणे : प्रतिनिधी –  लॉकडाऊन केल्यामुळे पूर्व हवेलीतील थेऊर, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, फुरसुंगी, मंतरवाडी, उरुळी देवाची आदी परिसरातील विक्रेत्यांनीही कमालीचे भाव वाढविण्याची संधी साधली आहे. नागरिकही नाईलाजाने खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने नागरिक घरामध्ये बसून असल्यामुळे रोजगार नाही. त्यातच आता किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सामान्यांची अक्षरशः लूट चालविली आहे, प्रशासनाने तातडीने संबधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरोनाचा व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केले. सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र, त्यातून खाद्यपदार्थ, भाजीपाला, रुग्णालये अशा सेवा वगळल्या आहेत. त्याचाच फायदा घेत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी ग्राहकांची अक्षरशः पाच-सहा पट भाव वाढवून लूट सुरू केली आहे.

देशभर लॉकडाऊन असले तरी किराणा दुकाने, औषधालये, अन्नधान्य, भाजीपाला, चिकन, मटन, दूध अशा जीवनावश्यक वस्तू वगळल्या आहेत. भाजीपाल्याची विक्री ठराविक वेळेत होत असल्याने नागरिक एकच गर्दी करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नका असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे मार्केटमध्ये चित्र दिसत आहे.

शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून शेतमाल पिकवितो. त्याच्याकडून भाजीपाला कवडीमोल किमतीने व्यापारी खरेदी करीत आहेत. हाच भाजीपाला व्यापारी आणि किरकोळ विक्रेते वाट्टेल त्या किमतीमध्ये विकत आहेत, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याविषयी कोणाकडे तक्रार करायची, पोलीस रस्त्यावर फिरू देत नाहीत, तर पोलीस चौकीत जाऊन तक्रार तरी कशी करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पूर्व हवेतील गावांमध्ये दुकानदार आणि भाजीविक्रेते दुप्पट-तिप्पट भावाने भाजीपाला विक्री करत आहेत. बटाटा 100, कांदा 90, चिकन 250 रुपये किलो

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like