भारतीय सैन्यांकडून चीनला ‘इशारा’ ! आम्हाला 1962 चं सैन्य समजू नये, ‘डोकलाम’ आठवावं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्याने चीनला कडक इशारा दिला आहे. ईस्टर्न आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल एमएम नरवणे यांनी म्हटले आहे की, आता आम्ही 1962 चे सैन्य नाही. चीन आम्हाला इतिहास आठवायला सांगत असेल तर आम्हीही त्यांना हेच सांगू. कोलकात्यामध्ये भारत चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आपल्या सीमांची सुरक्षा’ या परिसंवादात ते बोलत होते.

लेफ्टनंट जनरल एम.एम. नरवणे म्हणाले की, ‘1962 च्या युद्धाला आम्ही सैन्यावरील काळे निशाण म्हणून पाहत नाही. सर्व सैन्याच्या तुकड्यांनी चांगला लढा दिला आणि नेमून दिलेली कामे पूर्ण केली. डोकलाम वादाच्या वेळी भारतीय सैन्याने चीनपेक्षा जास्त वेळा LAC पार केला. जर चीनने 100 वेळा एलएसी ओलांडली तर आम्ही एलएसी 200 वेळा ओलांडला.

चीन हाच डोकलाम वादाचा भाग बनला. पण भारताने त्यास अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. यावरून हेच दिसून येते की आम्ही आता कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सक्षम आहोत. चीनला वाटले की दादागिरी करून आम्ही निघून जाऊ मात्र आम्ही त्यांचा मुकाबला केला. भारतीय सैन्यदल कोणत्याही शत्रूशी लढण्यास सक्षम आहे. त्यांनी दोन नव्या चौक्या तयार केल्या आम्हीही त्या ठिकाणी दोन नव्या चौक्या उभारल्या. ‘

2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून दोन महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरू होता. डोकलाम प्रदेश सिक्किमजवळील भारत-चीन-भूतान त्रिकूटावर आहे. हा भाग भूतानच्या हद्दीत येतो, परंतु चीन हा डोंगलाँग प्रांत असल्याचा दावा करतो.

आरोग्यविषयक वृत्त –