‘या’ कारणांमुळं रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी त्वचेची काळजी ! जाणून घ्या कशी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा स्वत:कडे लक्ष देणं होत नाही. अशात आपण त्वचेकडेही जास्त लक्ष देत नाही. म्हणून महिला असो वा पुरुष आपण दिवसा नाही, पण किमान रात्री झोपताना तरी त्वचेची काळजी घेतली पाहिजे. खास बात अशी की, रात्री झोपण्यापूर्वी घेतलेली त्वचेची काळजी घेतल्यास त्याचा फायदा जास्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

1) दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचं काम होत असतं. कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते. यासाठी झोपताना मॉईश्चरायजर,नाईट क्रिम, रिप्लेनिशिंग क्रीम, सीरम यांचा वापर करता येतो. दररोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करूनच झोपावं

2) प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. त्यामुळं कोणत्याही प्रकारची नाईट क्रीम लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतंही प्रॉडक्ट आपल्या मनानं वापरू नये.

3) रात्री झोपताना वापरण्याची सर्व उत्पादनं तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलबून असतात. त्वचा तेलकट किंवा अक्रे असलेली असेल तर ज्या क्रीममध्ये जास्त पाणी असेल अशी क्रीम वापरा. मात्र ते वारंवार वापरायचे की नाही यासाठी वैद्यांचा सल्ला घ्या, कारण याच्या अतिवापरामुळं मुरमेही येऊ शकतात.

4) दिवसभरात धूळ, माती, प्रदूषण, मेकअप, सौंदर्यप्रसाधने यांचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळं त्वचेवर असलेली रंध्रे झाकली जातात. त्यामुळं झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवावा. त्यानंतर नैसर्गिक क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायजर वापरावे.

5) त्वचेत ओलावा टिकून ठेवण्यासाठी सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर सीरम लावणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं असेल तर अँटी एजिंग सीरमचाही वापर करू शकता. त्वचा तेलकट असल्यास तुम्ही सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि रेटीनॉल पेस सीरम लावा. घरगुती सीरम म्हणून कोरफडीचा रस काढून एका बाटलीत साठवून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. परंतु ताज्या रसाचा वापर नेहमी करावा.

6) रात्री झोपण्याआधी त्वचेला मॉईश्चरायजरच्या मदतीनं मॉईश्चराईज करणं फार चांगली सवय आहे. यामुळं त्वचेवरील डेड स्कीन तर निघतेच सोबतच त्वचेला पोषणही मिळतं.

7) दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी त्वचा सक्रीय घटक अधिक प्रमाणात शोषून घेते. तसंच रात्री झोपेत त्वचेच्या पेशीनिर्मितीचा वेग अधिक असतो. त्यामुळं नाईट क्रीमच्या माध्यमातून त्वचेचं पोषण करण्यासाठी हीच योग्य वेळ असते.

8) रात्री रक्ताभिसरण अधिक वेगानं होत असतं आणि स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जातं. नाईट क्रीम लावल्यामुळं सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा आणि उजळपणा येतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.