‘या’ घरगुती उपायाने मिळवा पायांच्या दुर्गंधी पासून सुटका 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळा म्हटल की चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी. यामुळे अनेक जण त्रस्त होतात. जे लोक शूज वापरतात त्यानां तर या दिवसात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामुळे शूज वापरणाऱ्या लोकांच्या पायांना आणि मोज्यांना असह्य वास येतो. अशावेळी शूज काढून कुणाजवळ बसणंही कठीण होऊन जातं. मात्र ही समस्या दूर करण काही कठीण काम नाही खाली दिलेल्या व्हिनेगरच्या उपायाने तुम्ही या समस्येपासून प्रमाणात सुटका मिळवू शकतात.

पायांना दुर्गंधी येण्याचं कारण –
आपल्या पायाच्या त्वचेमध्ये २५००००० ग्लॅंड असतात, ज्यामुळे घाम तयार होत असतो. या सर्वच ग्लॅंडमधून वेगवेगळ्या दुर्गंधीचा घाम निघतो. या ग्लॅंड्सना जर योग्य तापमान आणि हवा मिळाली नाही तर दुर्गंधी असलेला घाम निघतो.

तसेच पायांमधून एक वेगळ्याप्रकारचा बॅक्टेरिया सुद्धा निघतो, जर आपण शूज टाइट घातले तर या टाइट शूजमुळे त्या बॅक्टेरियला शिफ्ट होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे हे पायांना चिकटतात. हे बॅक्टेरिया पायांना चिकटल्यावर चिकटपणा येतो आणि त्याने दुर्गंधी येते.

पायांची दुर्गंधी येण्याची काही कॉमन कारणे –

१) सिंथेटिक शूज –
याप्रकारचे शूज वापरल्याने पायांना घाम अधिक येतो आणि घाम सुकला नाही तर पायांची दुर्गंधी येऊ लागते.

२) तणाव –
अधिक तणावामुळेही दुर्गंधी असलेला घाम येतो आणि हा घाम पायांना आला तर अधिक अडचण होते.

३) जास्त वेळ टाइट शूज घालणे –
खूप वेळ जर टाइट शूज घातले तर पायांची डेड स्कीन आणि बॅक्टेरिया पायांना चिकटतो. त्यामुळे पायांना दुर्गंधी येते.

४) हार्मोन्स –
फार कमी लोकांना हे माहीत आहे की, हार्मोन्सच्या प्रकारामुळेही पायांची दुर्गंधी येते. हार्मोन्सच्या कारणांमुळे काही लोकांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येऊन त्यांच्या पायांना दुर्गंधी येते.

अशी दूर करा पायांची दुर्गंधी –
किचन मध्ये सहज उपलब्ध असलेल्या व्हिनेगर पासून तुम्ही पायाची दर्गंधी दूर करू शकता. एका छोट्या टबमध्ये पाय भिजतील इतकं कोमट पाणी घेऊन यात ३ ते ४ थेंब व्हिनेगर टाका या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. नंतर पाय स्वच्छ टॉवेलने कोरडे करा. हा उपाय कमीत कमी आठवड्यातून ३ वेळा करा. काही आठवडे हा उपाय केल्याने पायांच्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळेल.

व्हिनेगर कसं करतं काम ?
व्हिनेगरमध्ये अँटीमायक्रो बियल तत्व असतात. याने घाम आणि त्वचेमधील बॅक्टेरिया दूर करण्यास मदत होते. याचे काही साइड इफेक्टही नसतात. कारण हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.