पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी काही सोप्या टीप्स ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पावसाळ्यात कपडे धुण्याचा आणि ते वाळवण्याचा मोठा ताण असतो. अनेकदा कपड्यांना दुर्गंधही येतो. म्हणूनच पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) कपडे घट्ट पिळणं महत्त्वाचं – कपडे वाळत घालताना त्यातील पाणी नीट निथळून घ्या. शक्यतो पिळूनच तुम्ही चांगल्या प्रकारे पाणी काढू शकता. यामुळं ते लवकर सुकतील. वॉशिंग मशीन असेल तर दोन वेळा ड्राय मोडवर फिरवून घ्या.

2) हँगरचा वापर – कपडे वाळत घालताना शक्यतो हँगरचा वापर करा. यामुळं कमी जागेत जास्त कपडे बसतात. लहान कपड्यांसाठी हँगर वापरला तर मोठ्या कपड्यांसाठी जास्त जागाही मिळते. जर हँगरला लावून कपडे घरात किंवा फॅनखाली ठेवले असतील तर दारं खिडक्या उघडी ठेवा. यामुळं घरात हवा खेळती राहिल.

3) कपड्यांचा दुर्गंध टाळण्यासाठी – अनेक ओलसर कपडे घडी करून कपाटात ठेवल्यानं किंवा घरात वाळत घातल्यानं त्यांना कुबट वास येतो. अशा वेळी खोलीत धूप लावा. यामुळं कपड्यांचा दुर्गंध येणार नाही. लक्षात ठेवा धूप लावताना कपड्यांजवळ लावू नका, नाही तर आगीसारखी दुर्घटना घडू शकते.