लिव्हरसंबंधित आजारांची ‘लक्षणं’ अन् बचाव करण्यासाठी काही सोपे ‘उपाय’ ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आजकाल केवळ मोठ्यांनाच नाही तर नवजात बालकांसह लहान मुलांनाही लिव्हर संबंधित आजार प्रभावित करताना दिसत आहेत. लिव्हर हा मेंदूनंतर दुसरा महत्त्वाचा अवयव मानला जातो. लिव्हरच्या मदतीनंच इतर अवयव त्यांचं काम करू शकतात. परंतु लिव्हरची जर काही समस्या असेल तर याची लक्षणं पाहायला मिळत नाहीत. लहान मुलांना लिव्हरशी संबंधित काही आजार होऊ नयेत यासाठी जागरूकता निर्माण करण्याची खूप गरज आहे. आज आपण याची लक्षणं आणि काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

लिव्हरशी संबंधित आजारांची लक्षणं

आरोग्याशी संबंधित एका साईटनं दिलेल्या माहितीनुसार, लिव्हरसंबंधित काही समस्या असेल तर त्याची पुढीलप्रमाणे काही प्रमुख लक्षणं दिसून येतात.

– डोळ्यांचा पिवळेपणा
– लघवीचा रंग जास्त पिवळा दिसणं
– भूक न लागणं
– मळमळ होणं
– पायांवर सूज येणं
– वजन कमी होणं
– 100 पेक्षा जास्त आजार असे आहेत ज्यांना लिव्हरवर प्रभाव पडतो.
– जर तुम्हाला वरील प्रमाणे काही लक्षणं दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

काही सोपे उपाय

1) जन्म झाल्यानंतर प्रत्येक नवजात बालकाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं लगेच हेपेटायटीस बीची लस द्यायला हवी.

2) रक्त किंवा कोणत्याही ब्लड प्रॉडक्टचा वापर करण्याआधी हेपेटायटीस बी आणि सी यांची टेस्ट करावी. टेस्ट करून हे आधी निश्चित करावं की, रक्तात कोणत्या प्रकारचं संक्रमण तर नाहीये ना.

3) पाणी पिताना ते स्वच्छ आहे याची खात्री करावी. फळं आणि भाज्या यांचं सेवन करताना स्वच्छ धुवून घ्याव्यात.

4) जर एखाद्या नवजात बालकाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस काविळीची समस्या असेल तर वेळीच त्याला लिव्हरसंबंधित काही समस्या तर नाही ना याची तपासणी करावी. तसं निदान करून वेळीच त्याच्यावर उपाचर करावेत. अधिकाधिक बालकांना जन्मानंतर काविळ होते. परंतु ती 10 दिवसात ठिक होते.

5) लिव्हर संबंधित किंवा लिव्हरच्या जास्तीत जास्त आजारांमध्ये जर सुरुवातीलाच योग्य उपचार मिळाले तर याचे परिणाम चांगले मिळतात. रुग्णाला पुढं होणाऱ्या त्रासापासून आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन पासून वाचवलं जाऊ शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.